भाव तुझ्या डोळ्यतले
जाणुन घे माझ्या मनातले ।
मन माझे नाही आता
माझ्याच ग हातातले ।
ओढ का मज अशी लागली
सांग तुही मज मनातले ।
Sanjay R.
बघुन तुझे रुप
चुकतो ठोका काळजाचा ।
बघतो मग तुलाच मी
ह्रुदयासही पत्ता नसतो श्वासाचा ।
Sanjay R.
भावले रुप गुण मज
विसरलो सारा साज ।
नयनी तुच वसली
दे तु मजसी आवाज।
Sanjay R.
विसरायचीच आहेत
एक दिवस सारी नाती गोती ।
सोडायचे सारे इथेच
नसेल काहीच आपल्या हाती ।
महाल जरी असेल बांधला
उरेल फक्त मागे मातीच माती ।
क्षणाचीही उसंत नसेल कुणा
विसरतील सारे जाळुन वाती ।
Sanjay R.