लहान पण आठवते अजून. पूर्ण वर्ष जायचं होळीची वाट बघता बघता. तेव्हा होळीची दोन दोन दिवस सुट्टी असायची. त्यामुळे वर्गात अगोदरच रंग पंचमी सुरू व्हायची. वर्गात मग रंग शाईचे उपयोगी पडायचे. एकमेकांच्या अंगावर शाई फेकून रंगोत्सव साजरा व्हायचा. कुणी चिडायचा, कुणी मारायला धावायचा, पण त्यातही खूप मजा यायची. होळीच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळी मित्र मंडळी लाकड जमा करायला निघायची. गावाबाहेर वाळलेली झाडे बघून ती ओढत आणायची. त्यातही ऐक वेगळीच मजा होती. होळी पेटली की मग रात्रभर जागरण असायचे. कधी आमच्यातले मोठे उनाड पोरे, कुणाच्या घरुन लाकडे, बाजा, खाटा, पण चोरून आणून होळीत स्वाहा करायचे. मग दुसऱ्या दिवशी ज्याच्या घरून ते आणले ते खूप आरडाओरडा करायचे. शिव्या घालायचे. पण लाकडे कुणी आणली ते कधीच कळत नसे. मग सकाळी रंग खेळायला सुरुवात व्हायची. प्रत्येकाचा वेगळा रंग असायचा. सगळ्यांचे चेहरे अगदी अनोळखी होऊन जायचे. कुणी पाणी फेकून ओले करायचे, तर कुणी चिखलाने आंघोळ घालायचे. कुणाचा रंग हिरवा लाल तर कुणाचा काळा. त्या रंगात आई पण आपल्या मुलाला ओळखत नसे. शेवटी रंग खेळून थकलो की मग घरी जाऊन आंघोळ करायची, लागलेले रंग फिकट व्हायचे पण निघायचे मात्र नाही. मग पुरण पोळी, करंज्या चिवडा यांचा नास्ता करूनच पोट भरून जायचे. या सगळ्या आनंदात एखादा व्यक्ती दारू पिऊन तुल्ल होऊन यायचा. खूप ओरड करायचा. मुलं त्याला घाबरायचे पण दुरून त्याची नक्कल करायचे. मग तो खूप चिडायचा, शीवी द्यायचा , मागे धावायचा सुद्धा. पण त्या पळापळी त खूप मजा यायची. आजकाल मात्र ती मजा तो आनंद हरवला आहे असे वाटते. आता नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक रंग गुलालानी घेतली. व्यसन करणाऱ्यांची संख्या ही खूप वाढली. जंगले उरली नाहीत म्हणून लाकडे जाळणे पण कमी झाले. त्यामुळे होळीत रंग खेळायला भीतीच जास्त वाटते. रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा Sanjay Ronghe
निदान या दिवाळीत तरी कमली ला एखादी साडी घ्यावी, मुलीला फ्रॉक, मुलाला पॅन्ट शर्ट, थोडी मिठाई, थोडे फटाके घ्यावे असे वाटत होते पण पैसाच नाही तर काय आणि कसे खरेदी करणार…..
यंदा पावसाने पाठच सोडली नव्हती…..
शेतात सोयाबीन तर पूर्णच वाहून गेले होते…..
तुरीची झाडही आती पावसाने जळून वळून गेली होती…….
आता आशा फक्त कपाशीची होती…..
अर्धे नुकसान तर आधीच झाले होते……
बियाणे खत औषधाचा सारा खर्च वाया गेला होता…….
पराटी ही साथ देईल असे वाटत नव्हते. बोण्ड अळीचा काहीच भरोसा नव्हता…..
पावसामुळे झाडांची वाढही झाली नव्हती……
आलेली फुलं बोण्ड पकडायच्या आधीच पावसाने गळून पडत होते……
निसर्गाचा प्रकोप सुरूच होता……..
निंदन , औषध यातच पैसा लागत होता…..
तरी बरं होतं की कृषी केंद्र वाला उधारीत सगळं देत होता. नाहीतर जहर पिण्याशिवाय पर्यायच उरला नसता……..
पण आता उधरीचे पैसेही वाढत होते. त्यावर व्याज द्यावे लागणार होते………
तशातच आता ही दिवाळी आली. काय करावे काहीच सुचत नव्हते……..
नामा विचार करत आपल्या पराटी कडे बघत बसला होता…… तशातच संध्याकाळ व्हायला आली…..
सदा त्याला आवाज देत होता पण नामाच्या कानात त्याचा एकही शब्द जात नव्हता…….
शेवटी सदा नामाजवळ पोचला…….
नामा मात्र आपल्याच विचारात इतका मग्न झाला होता की त्याला कशाचेच भान उरले नव्हते…….
सदाने त्याला हलवून भानावर आणले…….
एकदम दचकून उठत नामा बोलला, “काऊन गा सदा काय म्हणत होता”…….
सम्या अरे चलतो का, तहसील ऑफिसला बाबांचं थोडं काम आहे, अर्धा एक तास लागेल बघ. लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ .
अरे यार विक्या नको, मला यार आज खूप काम आहे, ये ना तूच जाऊन. नाहीतर तुझ्या कामात माझं काम राहूनच जाईल. ये तूच जाऊन. चल मी येतोच.
ओके चल बाय म्हणून विकास बाबांच्या कामाला एकटाच तहसील ऑफिसला पोचला. बाबू जागेवर नव्हते, आजूबाजूला विचारले तर कळले की बाबू साहेबांकडे गेले आहेत, साहेबांची मीटिंग सुरू आहे, किमान एक तास तरी लागेल. काय करावे हा विचार करत विकास ऑफिसच्या बाहेर आला. वेळ काढायचा म्हणून इकडे तिकडे बघत बसला. वेळ निघता निघत नव्हता.
इतक्यात त्याच्या समोरून समीर चे वडील त्याला जाताना दिसले. म्हातारपणामुळे त्याना चालणे पण कठीण होत होते. कसे तरी थांबत थांबत ते पुढे जात होते. त्यांची ती अवस्था बघून विकास खूपच अस्वस्थ झाला. त्याला राहवले नाही आणि तो सरळ त्यांच्या जवळ पोचला. त्याने त्यांना नमस्कार केला.
” नमस्कार काका, मी मदत करू का तुम्हाला ” म्हणत त्याने त्यांना आधार दिला. काका कसे आहात म्हणत तो काकांना धरून त्याना आधार देत चालू लागला, तसे ते म्हणाले, ” काय रे विकास इकडे कुठे आलास ?” “काही नाही काका बाबांचे काम होते, म्हटलं मीच करून येतो,म्हणून आलो होतो बघा” पण बाबू मीटिंग मध्ये आहेत तर त्यांची वाट बघतोय”.
त्यावर काका म्हणाले अरे हो का, मला पण मग त्याच बाबुकडे काम आहे. मग आता वाट बघवीलागेल तर. चल मग तिकडे त्या ओट्यावर बसू या, म्हणत त्यानी आपली चालण्याची दिशा बदलली. दोघेही मग ओट्यावर बराच वेळ बसून राहिले.
मधेच काकांना काही आठवले, तसे ते म्हणाले “अरे विकास आज तर कॉलेजला तुमचे काही प्रोजेक्ट चे काम होते ना, मग तू नाही गेलास का,समीर तर सकाळीच गेला आहे. त्याला मी माझ्या कामात मदत करायला बोललो तर तो कॉलेजचे महत्त्वाचे काम आहे म्हणून म्हणत होता. तुम्ही दोघेही तर सोबतच आहात ना, मग तुला नव्हते का ते काम.”
तसे विकासाच्या लक्षात आले की समीर घरी खोटे बोलला, त्याला वडिलांना मदत करायची नसेल म्हणून तो काहीतरी कारण सांगून बाहेर भटकत असावा.
समीरच्या या वागणुकीचे विकासाला खुप वाईट वाटले. पण त्याने समीर वाडीलांपुढे खोटा पधु नये म्हणून त्यांना म्हणाला, ” काका माझे पण काम समीरच करतोय. बाकी मी इथून गेल्या नंतर करील त्यामुळे मी इथे येऊ शकलो. नाहीतर मला पण येता आले नसते. “
तरीही समीरचे वडील काय समजायचे ते समजले. ते विकासाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले. “खरच मुलगा असावा तर तुझ्या सारखा. किती काळजी करतोस रे तू तुझ्या बाबांची. “ “खूप छान .”
नंतर थोड्याच वेळात ते बाबू मीटिंग आटोपून आले. विकासने आपले आणि काकांचे पेपर त्यांच्याकडे देऊन काम पूर्ण केले. आणि मग त्यानेच आपल्या गाडीवर बसवून काकांना त्यांच्या घरी पोचवले.
काकांना विकासाचे ते वागणे खूप आवडले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, ” खरच रे बाबा विकास , तू तुझ्या आयुष्यात खूप मोठा व्यक्ती होशील .”
विकास काकांना सोडून घरी परत आला. त्याने घडलेला प्रसंग आपल्या बाबांना सांगितला. त्याच्या बाबांना पण आपल्या मुलाच्या अभिमान वाटला.
सायंकाळी अचानक विकास आणि समीरची भेट झाली तर समीर एकदम विकासावर भडकला, म्हणाला ” तू माझ्या बाबांना का भेटलास, ते त्यांचे काम करत होते ना, तू कशाला मध्ये लुडबुड केलीस.” ” माझी सम्पूर्ण इमेज घालवलीस. “ ” यापुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत तू ढवळाढवळ केलेली मला खपणार नाही.” ” मी माझे बघून घेईल तुझ्या कुठल्याच मदतीची मला गरज नाही.” ” आणि माझ्या घरच्यांना पण तू मदत केलेली मला बिलकुल नको आहे.” ” या पुढे माझ्याशी कधीच बोलू नकोस.” म्हणत समीर तिथून रागा रागाने निघून गेला .
विकासने समीरला खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु, समीर काहीच समजून घेण्यास तयार नव्हता. अशातच दोघांचा दुरावा वाढला.
आणि दोघांच्या मैत्रीचा आज असा अचानक ब्रेक अप झाला.
अगदी लहान पनापासून तो असाच आहे. कधीच स्वतःहून कुणाशी बोलत नसे. कुणी बोललं तर दुसऱ्यास कधी दुखावत नसे.
आवाज ही त्याचा गोड मधुर. पाहायला कुणीही खूपच सुंदर म्हणावं असा.
लहान असताना तर, सारेच त्याच्या आईस म्हणायचे…
“अग तारे चुकून हा मुलगा झाला असेल गं, बघ जरा मुलगीच असेल, विचार जरा डॉक्टरांना”.
” इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी होती “.
मग तारालाही वाटायचं ही मुलगीच असती तर किती छान झालं असत.
तिलाही मुलीचीच आवड होती.
मग ती मनिषला मुलींचीच कपडे घालून छान पावडर गंध लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची.
मनीष त्या वेशात खूपच सुंदर दिसायचा. कुणीही त्याला उचलून घ्यायचे. खूप लाड करायचे.
मनीष मात्र अगदी लहान असताना पासून मग गोंधळून जायचा. त्याला काय करावे काय बोलावे काहीच सुचत नसे. तो शांत राहून फक्त बघत बसायचा .
होता होता मनीष मोठा होत होता. पण आता तो मुलांना टाळू लागला होता. त्यांच्यापासून दुर दूर राहायचा.
त्याला स्वतःतच रमायला आवडायचे. तो आपल्याच विश्वात जास्त आनंदी असायचा. कुणी काही बोललं की गोंधळून जायचा. काय बोलावे. काय उत्तर द्यावे काहीच सुचत नसे.
आता मनीष सोळा सतरा वर्षाचा झाला होता. पण सदा त्याच्या मनात एक वेगळी घालमेल सुरू असायची.
त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटायचे. आपणही तसे कपडे घालून मिरवावे, केसांची छान वेगवेगळी हेअर स्टाईल करून घेऊन मस्त पैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे, चेहऱ्यावर मस्त पावडर, क्रीम लावून, कपाळावर बिंदी लावून, ओठांना छान रंगीत गुलाबी लीप स्टिक लावावी. मस्त नटावे अशी इच्छा त्याला नेहमीच वाटायची.
पण कधी तसे करून बघितलेच आणि आई ला ते कळले तर मात्र ती मनीष वर खूप ओरडायची रागवायची. त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाल्ला होता.
पण त्याला काहीच कळत नव्हते. त्याला ही अशी इच्छा का होते.
एक दोनदा त्याने आई जवळ तसे संगण्याचा प्रयत्नही केला. पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नव्हते.
आता त्याच्या चालण्या बोलण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता.
शाळेतली मुलं त्याची टिंगल करायचे. त्याला मनीषा मनीषा म्हणून चिडवायचे.
त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा. मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा. स्वतःच रडत राहायचा.
का मी हा असा ? स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा.
त्याच्या मनाचा कोंडमारा व्हायचा.
मात्र त्याला कुणी मनीषा म्हटलं की खूप छान वाटायचं.
आताशा त्याने शाळेत जाणे पण बंदच केले होते. घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांत जागी जाऊन तो वेळ काढायचा, आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी बरोबर घरी यायचा.
मनातला कोंडमारा कुणाजवळ मोकळा करावा काहीच कळत नव्हते. आईला काही सांगायचे म्हटले तीही खूप रागवायची.
मग त्याला वाटायचे आपले लहानपणच किती छान होते. सगळे किती लाड करायचे.
आणि आता, आता तर सगळेच मला दूर सारतात. का हे असे होत आहे ? देवा मलाच का हे असं बनवलं? यात माझा काय गुन्हा?
तो खूप रडायचा . मग त्याला देवाचाही राग यायचा. कुणीच त्याला समजून घ्यायला तयारच नव्हते.
आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरुन काढत होते. काय करावे काहीच कळत नव्हते.
नेहमीच तो दुःखी रहायला लागला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला.
आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले. देवाला नमस्कार केला.
आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली. तो अचानक आईला बिलंगला. त्याला आईला सोडूच नये असे वाटत होते.
आईनेच त्याला रागावून बाजूला केले. म्हणाली अरे हे काय मनीष. आता तू लहान का आहेस. जा तुझ्या शाळेची वेळ झाली बघ. निघ शाळेला वेळ व्हायला नको. उशीर झाला तर टीचर पनिश करतील तुला.
जड अंतकरणाने तो आई पासून दूर झाला. त्याने आपली स्कुल बॅग उचलली आणि निघाला.
आज मुद्दाम तो वर्गात गेला. सगळी मुलं त्याची टिंगल करत होते.
कुणीच त्याला इतके दिवस का आला नाही , कुठे होता, काय झाले काहीच विचारत नव्हते.
सगळ्यांना फक्त त्याची टिंगल मात्र करायचे सुचत होते. त्याला सगळ्यांचाच खूप राग आला. मग मात्र तो स्कुल मध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्याच तंद्रीत निघाला.
सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही म्हणून तारा ला काळजी लागली. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते.
तेवढ्यात कोणी तरी तिला सांगितले गावाच्या बाहेर कुणी तरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली.
तिचा हृदयाचा थरकाप उडाला ती तशीच खाली बसून रडायलाच लागली….
दिवसामागून दिवस जात होते. आता नाईक आणि राणी मध्ये संवाद सुरू झाला होता. नाईकांना राणी आणि राणीला नाईक आवडायला लागले होते. नाईक वेळ मिळेल तसे राणीला घेऊन बाहेर कुठेतरी फिरूनही यायचे. दोघनमध्ये प्रेम जिव्हाळा हळू हळू वाढत होता. नाईकांची आवड निवड आता राणीलाही कळायला लागली होती. त्यांना जे जे आवडते ती तसे करायची. तिलाही त्यात आनंद मिळायचा. मुलांसोबत ती नाईकांना ही खुप जपत होती. नाईकही राणीला हवे नको सारे करायचा प्रयत्न करायचे. नाईकांचा संसार आता फुलायला लागला होता. घरात नेहमी आनंद उत्साह असायचा.
अचानक एक दिवस नाईकांची तब्येत बिघडली. अंगात थंडी वाजून ताप भरला. तशी राणीला खूप काळजी वाटायला लागली. लागलीच तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि नाईकांना घेऊन ती डॉक्टरांकडे पोचली. डॉक्टरांनी चेक करून काळजी चे कारण नाही , व्हायरल फिवर असल्याचे सांगितले, पण तीन दिवस काढावे लागतील असे सांगितले. काही औषधे त्यांनी लिहून दिले. राणीने परत येता येताच ती औषधे घेतली आणि ते घरी आले. नाईकांना बेड वर झोपवून ती कामाला लागली. नाईकांसाठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढले. आणि ती नाईकांच्या रुम मध्ये गेली. नाईक शांत पणे झोपले होते. ती तिथेच नाईकांकडे पहात बसून राहिली. थोड्या वेळात नाईक जागे झाले. तसे राणीने त्यांना थोडे खाऊन घेण्यासाठी विनवले. नाईकांना खाण्याची इच्छाच होत नव्हती पण राणीच्या आग्रहाखातर त्यांनी थोडी सोजी आणि वरण घेतले. नंतर राणीने त्यांना औषधे दिली. आणि ती नाईकांच्या शेजारी बसून राहिली. नाईकांनी राणी चा हात घेऊन तो आपल्या कपाळावर ठेवला. तसे राणी समजली की नाईकांचे डोके दुखत आहे, तिने ते दाबायला सुरवात केली. आता नाईकांनाही बरे वाटत होते. राणीने नाईकांचे कपाळ, डोके, हात पाय. दाबून दिले, तसे नाईकांना बरे वाटायला लागले. ते सारखे राणीकडे टक लावून बघत होते. राणी मात्र मन लावून नाईकांची सेवा करण्यात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर नाईकांची काळजी पूर्ण पणे दिसत होती. नाईकांना तिची ती सेवा घेण्यात खूप समाधान वाटत होते. त्यांनी मग हळूच राणीचा हात आपल्या जवळ घेतला . आणि तिच्या हातरुन ते आपला हात कितीतरी वेळ फिरवत राहिले. राणीलाही त्यात खूप समाधान मिळत होते. आज पहिल्यांदाच दोघे इतक्या जवळ येक दुसऱ्याचे हात हातात घेऊन नजरेत नजर टाकून बघत होते. दोघनच्याही चेहऱ्यावरून प्रेम भाव व्यक्त होत होता.
आता सायंकाळ होत आली होती. तशी राणी आपल्या कामात लागली. मुलंही खेळण्यात मग्न झाली होती. राणीने आपला स्वयंपाक आटोपला. आणि परत ती नाईकांच्या जवळ जाऊन बसून राहिली. सायंकाळचे आठ वाजायला आले तसे राणीने मुलांना जेवायला वाढून दिले आणि नाईकांसाठी गरम गरम खिचडी घेऊन गेली. नाईकांना आता बराच आराम वाटत होता. राणीनेच नाईकांना चमच्या चमच्याने नाईकांना खिचडी भरवली. त्यांना पाणी देऊन ती मुलांकडे आली. मुलांचे जेवण आटोपले होते. तिने मग स्वतःसाठी वाढून घेतले आणि जेवण करून सगळी ठेव रेव करून मुलांचे बिछाने व्यवस्थित केले. मुलं ही आता झोपायच्या तयारीला लागले होते. थोडा वेळ ती मुलांच्या रुम मधेच बसून मुलांना थोपटत राहिली. मुलं आता झोपी गेले होती. तशी ती परत नाईकांच्या रुम मध्ये आली. नाईक तिला बघून हळूच हसले. तिने नाईकांचे औषध काढून नाईकांना त्यांच्या हातात दिले. आणि त्यांच्या साठी पाणी घेऊन आली. नाईकांनी औषध घेतले. आता त्यांना खूप बरे वाटत होते. तापही उतरला होता. त्यांना चांगले पाहुन राणीलाही बरे वाटत होते. नाईकांनीच तिला आपल्या बाजूला कॉटवर बसवून घेतले. राणी नाईकांकडे बघत बसून राहिली. मग नाईकांनीच तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावरून आपला हात फिरवत राहिले. त्यातच राणीचा साडीचा पदर थोडा खाली गेला. ते राणीच्या लक्षात आले नाही. नाईकांच्या मात्र ते लक्षात आले. राणी आता खूप सुंदर दिसत होती. तिच्या शरीराची ठेवणही तिच्या रुपाला अजून खुलवत होती. नाईक आज पहिल्यांदाच राणीला इतकं जवळ घेऊन तिचे रूप न्याहाळत होते. राणी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. नाईकांनी राणीला आपल्या अजून जवळ घेतले. आणि त्यांचा स्वतः वरचा ताबाच सुटला. नाईकांनी हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांचे ओठ राणीच्या ओठावर टेकले. तशी त्यांची मिठी अजूनच घट्ट झाली. राणी नाईकांच्या प्रत्येक कृत्याला नकार देऊच शकली नाही. दोघांमध्ये आज प्रथमच स्पर्शाची देवाण घेवाण होत होती. नाईक आणि राणी सर्वस्वाने एक झाले होते. नाईकांच्या मिठीत ती केव्हा झोपी गेली ते तिलाही कळले नाही.
सकाळ झाली होती. पक्षांची किलबिल सुरू होती. तशातच राणीला जाग आली. ती अजूनही नाईकांच्या मिठीतच होती. आणि त्याच स्थितीत दोघेही झोपी गेले होते. ती मिठी अजूनही सैल झाली नव्हती. राणीने हळूच नाईकांच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले. नाईकांना ती बराच वेळ त्याच अवस्थेत निरखत राहिली. तिने हळूच त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग हलकेच तिने नाईकांच्या अंगावर पांघरूण घातले. पांघरून वयवस्थित करून मग उठून तिने आपली साडी व्यवस्थित करून घेतली आणि आंघोळीला गेली. आज प्रथमच नाईकांनी राणीला सर्वस्वाने स्वीकार केले होते. राणीही पूर्णपणे नाईकांची झाली होती. दोघांच्या मधे असलेला पडदा पूर्णपणे दूर झाला होता. ती खुशी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिचा उत्साह द्विगुणित झाला होता.
सनी आणि निलू यांचा संसार अगदी सुखात सुरू होता. सनीला चांगली नोकरी मिळाली. पगारही बऱ्यापैकी होता. नवीन संसाराची सुरवात छान थाटात सुरू झाली. संसार नवा असल्याने घरात सामान , वस्तू यांची जमवाजमव सुरू हाती. नोकरी शहरापासून लांब असलेल्या भागात होती. त्यामुळे त्यांचे राहणेही त्याच भागात छोटयाशा गावात होते. गावात सुख सुविधा थोड्या कमीच होत्या. पण कुठलेच काम असे अडत नव्हते. छोट्या मोठ्या गरजेच्या वस्तू आजूबाजूच्या गावात पूर्ण व्हायच्या. पण काही मोठी खरेदी करायची म्हटले तर मात्र शहरात जावे लागायचे.
अशातच सईचा जन्म झाला आणि घरात सगळे आनंदी झाले. सईचे आगमन सनी आणि निलू साठी खूपच शुभ ठरले. सनीचे ऑफिस मधे प्रमोशन झाले. पगारात वाढ मिळाली. आणि मग घरात आनंदाचे वातावरण पसरले. पगारात वाढ झाली आणि मग त्यानुसार घरात गरजाही वाढल्या. हे हवे ते हवे असे वाटायला लागले. सई आता दीड वर्षाची झाली होती. तिच्या पायांना चाके लागल्यागत ती ठुमकत ठुमकत इकडे तिकडे फिरायला लागली. स्वस्थ अशी ती कधी बसताच नव्हती. दिवसभर घरभर फिरत असायची. समोरच्या घरी तिच्याच वयाचा वरद होता. दोघांची खूप गट्टी जमली. मग दोघेही ठुमकत ठुमकत येकमेकाच्या घरी अगदी स्वैपाक खोली पर्यंत जाऊन पोचले. दोघांनाही एकमेकांशिवाय करमतच नसे. दिवसभर त्यांचे भटकणे सुरू असायचे.
एक दिवस तर दोघेही खेळता खेळता जिना चढून घराच्या गच्ची वर पोचले. गच्ची ला भिंतच नव्हती. आणि त्यामुळे गच्ची वरून वाकून बघता बघता सईचा तोल गेला. पण तिच्या हातात स्लॅब ची सळाक आल्याने ती तिने घट्ट धरून ठेवली. आणि मग ती त्या सळाकीला धरून लटकून राहिली. ते समोरच्या काकांच्या लक्षात आले आणि ते धावत पळत गच्चीवर पोचले. त्यांनी सईला आधार देऊन खाली उतरवले. सईला कपाळाला थोडे खरचटले , पण खूप मोठा अनर्थ होता होता टाळला होता. सनी आणि निलु साठी ते काका देव म्हणूनच धावून आले. आणि त्यांनी सईला वाचवले होते . नाहीतर काय घडले असते ते काहीच सांगता येत नव्हते. त्यांच्या सजगते मुळे सईला काहीच झाले नाही. त्यांनी काकांचे खूप आभार मानले. आणि एक प्रण केला की या पुढे सईला कुठेच एकटे सोडायचे नाही. त्यानंतर निलू सईला खूप जपायची. सारखी तिच्या मागे पुढे असायची. पण मुलं ती मुलचं असतात. गडबड करणार नाहीत तर ती मुलं कसली. आई बाबांचा डोळा चुकवून काहीतरी वेगळं करण्याचा जणू त्यांनी विडाच घेतला असतो.
अशातच दिवाळी अगदी तोंडावर आली होती. यंदा दिवाळी छान थाटात साजरी करायची सनी निलुचे ठरले. नवीन कपडे, घरात लागणारे काही सामान व इतर काही खरेदी करायचा प्लान झाला. दिवाळीचा बोनस हातात आला आणी मग सनी आणि निलुचे खरेदीला शहरात बाजारात जायचे ठरले. मोठ्या खरेदीसाठी शहरात जावे लागायचे. कारण गावात मोठया वस्तू मिळणे शक्य नव्हते.
सनी निलू आणि सई तिघेही तयार होऊन दुपारीच बाजाराला निघाले. बाजारात पोचले तर तिथे अफाट गर्दी लोटली होती. बाजाराला जणू उधाण आले होते. ठिकठिकाणी विक्रेते, खरीदादार यांचे घोळके जमा होते. दुकाने हाऊसफुल भरलेले होते. कपडे आणि भांडाच्या दुकानात तर पाय ठेवायला पण जागा नव्हती.
सनी सई चा हात धरून तिला चालवत होता. तर निलू हे घेऊ की ते घेऊ या अविर्भावात तिची खरेदी करत होती. खरेदी करता करता सायंकाळ झाली. खूप सारी खरेदी झाली होती. आता सनीच्या हातात समानाने भरलेल्या पिशव्या पण होत्या. त्यात तो कसा तरी सईचा हात धरून तिला चालवत होता. दिवसभर चालून चालून आणि उभे राहून आता तिघेही थकले होते. कुठे तरी बसून चहा नास्ता करावा म्हणून ते समोरच्या एका हॉटेल मध्ये घुसले. चहा नास्ता आटोपला आता थोडे बरे वाटत होते.
ते हॉटेल च्या बाहेर निघाले तर समोर एका भांड्याच्या दुकानापुढे मिक्सर ग्राइंडर चा डेमो सुरू होता. तिघेही तो डेमो पाहण्यात व्यस्त झाले. तितक्यात निलुला काही तरी आठवले आणि ती भांड्याच्या दुकानात गेली. आता सनी आणि सई दोघेच तिथे उरले होते. बाजूला एक फुग्गेवाला फुग्गे विकत तिथे आला. सईचे लक्ष तिकडे गेले. आणि तिने बलून बलून करत आपला हात सनीच्या हातातून सोडवून घेत तिकडे धावली. सनीला ते कळलेच नाही. तो डेमो पाहण्यात अगदी मग्न झाला होता. निलू दुकानातून खरेदी करून परत सनी कडे आली. तर तिला सई दिसेना. म्हणून तिने सनीला सईबद्दल विचारले. सनी बाजूला सई नसल्याचे पाहून घाबरला. तो इकडे तिकडे तिला शोधायला लागला. पण सई तिथे कुठेच नव्हती. आता सनी आणि निलू दोघेही खूप घाबरले. त्यांच्या पायातले त्राणच निघून गेले. काय करावे , कुठे शोधावे काहीच कळत नव्हते. सनीने आपल्या हातातल्या पिशव्या निलूच्या हातात देऊन तो इकडे तिकडे सई सई करत पाळायला लागला. पण सई कुठेच दिसत नव्हती. तो लांब पर्यंत जाऊन परत आला. निलू तर सई सई करत रडायलाच लागली होती. कुणालाच काही कळत नव्हते.
परत सनी सईला शोधायला निघाला. गर्दीचे घोळके घोळके शोधू लागला. आता त्याला ती गर्दी नकोशी वाटायला लागली. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. काय करावे काहीच कळत नव्हते. त्याला खूप जोरजोराने सईला आवाज द्यावा वाटत होते. पण आता तोंडातून आवाज पण निघत नव्हता . त्याला खूप अपराधी पणा जाणवत होता. मनात अनेक विचार घोळ करत होते.
तेवढ्यात, तो राहत होता तिथलेच शेजारी त्याला तिथे दिसले. तो त्यांच्याकडे धावला. आणि त्यांचा हात धरून त्यांना सांगू लागला अहो सतिशराव सायली हरवली हो या बाजारात ती कुठेच दिसत नाही आहे. तेवढ्यात सतिशरावांची पत्नी कडेवर सईला घेऊन तिथे हजर झाली. सनीला काहीच कळत नव्हते. त्याने ओढून सईला आपल्या कडेवर घेतले. आणि रडायला लागला.
मग थोडे शांत होताच सतिशरावच सांगायला लागले. अरे सनी ही सई पुढच्या चौकात रडत रडत चालली होती. तिला बघून पोलिसांनी तिला जवळ घेतले. आम्ही नेमके त्याच वेळी तिथून जात होतो. तर सई दिसली. सकाळी तुम्ही खरेदीला इकडे आलात ते आम्हाला माहिती होते, आणि आमच्या लक्षात आले की ही इथे हरवली आहे. मग आम्ही पोलिसांना ही आमचीच मुलगी असल्याचे सांगून तिला जवळ घेतले. आता आम्ही तुम्हालाच शोधत होतो.
चला निलू कुठे आहे म्हणत, ते सारे निलू जवळ पोचले. सईला बघून निलुचे आता रडणे थांबले होते. तिला सई आणि माझ्या सोबत सतिशराव बघून थोडे आश्चर्य वाटले. तिने सईला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत म्हणाली, “अरे बिट्टू कुठे गेली होती बेटा “.
सतीश रावानी परत सई कशी मिळाली ते निलुला सांगितले. सतिशराव देव रूपानेच तिथे अवतरले होते. आणि सई परत मिळाली होती. सगळयांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसत होती. आज मोठा अनर्थ टळला होता.
दिवाळीची गेलेली हौस आता चेहऱ्यावर साफ दिसत होती. सगळा गोंधळ त्या बलून साठी झाला होता.बलून मात्र दुरून सगळ्यांकडे बघून हसत होता.
एक पडका वाडा . खूप जुना असा तो वाडा. अगदी गावाच्या बाहेर गावापासून बराच लांब .
गावा पासून थोड्याच अंतरावर जंगल सुरू व्हायचे आणी आत जंगलात तो वाडा होता . तिकडे जायला रस्ता पण नव्हता. कधी काळी रस्ता असावा पण आता तिकडे कोणीच जात नसल्याने रस्ता दिसेनासा झाला असावा.
जंगलाच्या एका बाजूने नदी वाहायची. जंगली जनावरांचा तिथे वावर असल्याने सगळेच तिकडे जायला घाबरत असत. कुणालाही प्रश्न पडावा या जंगलात इतक्या आत कुणी कशाला बांधला असावा हा वाडा . कोण रहात असेल तिथे. मला कुतूहल निर्माण झाले आणि मग मी ठरवले या वाड्याबद्दलची माहिती काढायचीच. पण कुणीही त्या बद्दल माहिती देऊ शकले नाही. प्रत्यकजन हेच सांगायचा . बाबा तिकडे जाऊ नकोस. जो गेला तो मेला. परत कधीच नाही आला . चुकूनही तिकडे जायचे नाही. प्राण संकटात द्यायचे नाही.
प्रश्नाचे उत्तर भेटत नसल्याचे पाहून माझी उत्सुकता अजूनच वाढत होती. कोण सांगेल त्या वाड्याबद्दलची माहिती. मग मी काही गावातल्या जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारायचे ठरवले. पण तेही काहीच सांगू शकले नाही. मग मात्र मी अस्वस्थ व्हायला लागलो. सारख वाटायचं आपणच जावं तिकडे आणि काही शोध लागतो का ते बघावं. पण मनातल्या भीतीचा विजय व्हायचा. आणि माझी हिम्मत तुटायची. अशी बरीच वर्षे निघून गेली.
मीही आता शहरात नोकरीला लागलो होतो. कामाच्या गराड्यात मी तो वाडाही विसरलो होतो. पण अचानक एक दिवस माझा मित्र शिरीष मझ्याकडे आला, म्हणाला, ” विशाल चल यार या दिवाळीत मस्त आठ दिवस सुट्टी घेऊ आणि कुठेतरी छान फिरून येऊ. रोज तेच ते काम करून कंटाळा आला बघ. काहीतरी वेगळं करावं वाटतंय, काही साहसी . काही थरारक असं वेगळं काहीतरी करावं वाटते रे. खूप कंटाळा आला या रोजच्या कामाचा. “मग त्यानेच सुचवले, ” चल यार आपण तुझ्याच गावाला जाऊ. मस्त जंगल फिरू. काही वेगळं नक्कीच अनुभवायला मिळेल. ” मग अचानक मला त्या वाड्याची आठवण झाली. मी त्याला म्हणालो, बघ शिरीष तुला वाटत ना काहीतरी वेगळं करावं. अशी एक जागा आमच्या गावाकडे आहे. तुझ्यात तेवढी हिम्मत असेल तर सांग . मी पण येईल तुझ्या सोबत.” आणि मग मी त्याला त्या वाड्याबद्दल सगळे सांगितले. तसा तो म्हणाला आरे यार तू आत्ता संगतोयस, अगोदर का नाही सांगितलं. आपण नक्कीच तिकडे जाऊन आलो असतो. जाउ दे आता जाऊ या आपण पुढल्या आठवड्यात सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. ते चार दिवस आपण तुझ्या गावात घालवायचे. ठरले , एकदम पक्के. “
आम्ही दोघांनीही आपापल्या ब्यागा भरल्या. आणि बुधवारी रात्रीच गावात पोचलो. गुरुवार ते रविवार सलग चार दिवस सुट्टी होती. रात्री मस्त खास भाजी भाकरी चा बेत होता. जेवण करून आम्ही आरामात लेटलो. तो एकदम सकाळीच जाग आली.
अंघोळ चहा नास्ता आटोपून आम्ही दोघेही त्या वाड्याकडे निघालो. सोबतीला गावाचाच आमच्याच वयाचा माझा मित्र शिवा सोबतीला होता. सगळयांनी आपल्या पाठीवरच्या ब्यागा सोबत घेतल्या, त्यात आवश्यक ते सगळे सामान होते. मी आपल्या ब्याग मध्ये कॅमेरा, बॅटरी चे सेल, टॉर्च, रस्सी, कैची, चाकू, लायटर, मोबाईल व इतर आवश्यक सामान व थोडे नाश्त्याचे पाकीट, पाण्याच्या बॉटल्स सोबत घेतले. शिवाने आम्हा तिघांसाठी चांगली दोन दिवस पुरेल इतकी न्याहारी बांधून घेतली होती. प्रत्येकाने आम्ही हातात काठी घेतली आणि तिघेही निघालो त्या पडक्या वाड्याच्या दिशेने.
आता मुख्य रस्त्यापासून आत जायचे होते. तिकडे जायला रस्ता हा नव्हताच, झाडा झुडपातून रस्ता काढत आम्ही तिघेही पुढे जात होतो. तेवढ्यात समोर एक लांब साप फणा काढून समोर उभा ठाकला. आम्ही तिघेही जागेवरच थांबलो. शिवा ने एक छोटासा दगड उचलून दुसऱया दिशेने भिरकावला. तिकडे पाला पाचोळ्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकून साप त्या दिशेने निघून गेला. परत आम्ही तिघेही पुढे चालायला लागलो. मध्ये मध्ये जँगली जनावरांचे , पखरांचे आवाज येत होते. पुढे एका उंच झाडावर काही बंदर आरामात बसून होते. आम्हाला बघून त्यांनी जागेवरच उड्या घेतल्या. आणि हुप हुप करत आवाज काढला. कदाचित ते बाकी सगळ्या प्राण्यांना सतर्कतेचा इशारा देत असावे.
मी, शिरीष आणि शिवा रस्ता काढत पुढे चालत होतो. तेवढ्यात आम्हाला ती पडक्या वाड्याची इमारत दिसायला लागली. आम्हा तिघांचीही उत्सुकता वाढत होती. तेवढ्यात झाडीतून फडफडण्याचा आवाज आला, आणि तो आवाज पुढे पुढे जात बंद झाला. कुठले तरी जनावर किंवा पक्षी झाडीत बसून असणार, आणि आमचा माग लागताच ते तिथून पळून गेले असावे. पण ते काय होते ते कुणालाच कळले नाही. मग आम्ही तिघांनीही आता आपल्या काठ्या खाली आपटत त्यांचा आवाज काढायला सुरुवात केली. तेवढ्यात शिरिष च्या डोक्याला टोच मारून एक कावळा काव काव करत उडत गेला. आम्हा तिघांसाठीही हा वेगळाच अनुभव होता. काय होत आहे काहीच कळत नव्हते. मनात थोडी भीती भरली होती. पडका वाडा समोरच दिसायला लागला होता. वाड्याची खूपच पडझड झाली होती. समोरचे मुख्य गेट कसेतरी तोल सांभाळत उभे होते. कंपाउंड वॉल कुठे शाबूत तर कुठे धाराशायी झाली होती. आम्ही तिघेही आता कंपाऊंड वॉल च्या आत पोचलो होतो. सगळीकडे झुडपं वाढलेली होती. खाली पाय ठेवताना जपूनच ठेवावा लागत होता. तेवढ्यात एक ससा आडवा गेला. तसा शिवा ने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला. आम्ही तिघेही जागेवरच थांबलो. सशाच्या मागोमाग एक अतिशय चपळ गतीने भला मोठा साप जात होता. क्षणात दोघेही अदृश्य झाले.
आता आम्ही तिघेही वाड्याच्या पुढच्या भागात पोचलो होतो. दारातच कुठल्या मोठा प्राण्यांचा सांगाडा पडलेला होता. कदाचित तो प्राणी कुठल्यातरी हिंसक जनावराची शिकार झालेला असावा. आता तिथे फक्त हाडांचा सापळा तेवढा बाकी उरला होता. आम्ही तिघेही तो हाडांचा सापळा बघून थोडे घाबरलो होतो. जवळपास कुठले हिंसक जनावर तर लपून बसले नसावे. आम्हाला शंका आली. मग आम्ही आजूबाजूला अंदाज घ्यायला लागलो. तिघांनीही काठी खाली आपटून आवाज करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एक काळे काळे लांब केस असलेले जनावर झुडपातून आमच्याकडेच बघत असल्याचे जाणवले. आम्ही तिघेही काठ्या उगारून त्या जनावरकडे बघायला लागलो. ते लांब लांब केस असलेले, लांब तोंड असलेले काळे अस्वल होते. आता आम्हा तिघांनाही घाम फुटला. तोंडातून आवाज निघत नव्हता. आम्ही सगळे त्या अस्वलाकडे बघत होतो. ते केव्हा आमच्यावर झडप घेईल काहीच सांगता येत नव्हते. तसे शिवाने आपली काठी जोर जोरात खाली जमिनीवर आपटायला सुरुवात केली. तसे शिरीष आणि मी भानावर आलो, आणि शिवासारखेच आम्ही आपली काठी आपटायला लागलो. ते बघून अस्वल घाबरले आणि गुरगुरात झाडीतून अदृश्य झाले. तेव्हा कुठे आम्हा तिघाच्याही जीवात जीव आला .
आता आम्ही वाड्याच्या मुख्य दरवाजा पुढे पोचलो होतो. दार उघडे सताड होते. आत जाण्याची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. आम्ही तिघेही एकमेकांकडे बघत होतो. मग शिवानेच परत काठी आपटून आतला अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आत पूर्ण अंधार जाणवत होता. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते कळत नव्हते. शिरीष ने मग आपला टॉर्च काढला. टॉर्च च्या प्रकाशात त्यानी आतला अंदाज घेतला तेवढ्यात आतून फडफड करत काही कबुतर बाहेर उडाले. तो फडफडण्याचा आवाज ऐकून परत आम्ही तिघेही थोडे घाबरले. पण कबुतर असल्याची खात्री होताच परत आम्ही मोठा श्वास सोडला. टॉर्च च्या प्रकाशात आतला थोडा अंदाज आला. तो खूप मोठा हॉल असावा. आणि त्याचे मागे आणि आजूबाजूला काही खोल्या असाव्यात. पण आत पाय ठेवायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. मग आम्ही तिघानीही आपले आपले टॉर्च काढले, आता सम्पूर्ण हॉल प्रकाशित झाला होता.
आत काही तुटके फुटके सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आत अजून कुठले जनावर असल्याचे वाटत नव्हते. आत कुबट असा वास येत होता. मग शिवा ने हिम्मत करून आत प्रवेश केला. त्याच्या मागोमाग मी आणि शिरीष ही आता पोचलो. आतले दृश्य बघून तर आम्हा तिघांनाही थरकाप सुटला. जिकडे तिकडे हाडांचे सापळे, सुकलेले मासांचे गोळे किडे, माकडे, पसरलेले होते. कोळ्यांच्या जाळ्याने भरलेला सम्पूर्ण वाडा भयावह भासत होता. आत घाण कुबट असा वास पसरलेला होता. कित्येक वर्षात तिथे कोणी मनुष्य आला नसल्याचे दिसत होते. तिथे फक्त जंगली जनावरे येत जात असल्याचे दिसत होते. जिकडे तिकडे कबुतर आणि वटवाघूळ यांची वस्ती दिसत होती. भिंतीमधून दारे खिडक्या काढून नेल्याचे दिसत होते. उपयोगी पडणारे असे काहीच सामान तीथे दिसत नव्हते, होत्या त्या फक्त पडक्या भकास वाटणाऱ्या भिंती आणि भीती दाखवणारे हाडांचे सापळे.
uमग आम्ही तिघांनीही अजून वाड्याच्या आत जायचे ठरवले. हॉल पार करून आम्ही आतल्या खोली मध्ये पोचलो. तिथेही काही वेगळे चित्र नव्हते बाहेरच्या सारखीच स्थिती तिथेही होती. मग आम्ही एक एक खोली चेक करत आत पोचलो. आत खूप मोठे किचन होते. तिथे चार स्वयंपाकाच्या चुली लागलेल्या होत्या. चुलीच्या वर धुपट काढायला नळकांडे लागलेले होते. पाण्यासाठी मोठे रांजण होते, ते आता तूट फूट झाले होते.
तिथून मग आम्ही मागच्या आवारात पोचलो. तोही परिसर खूप मोठा होता. मागच्या बाजूलाही काही खोल्या काढलेल्या होत्या. त्यातल्या काही पडलेल्या तर काही सुस्थितीत होत्या. तिथे कोणी राहत असावे असे मात्र वाटत नव्हते. बाजूला एक मचाण बांधलेले होते . मचाण बरेच उंच होते आम्ही ते चढून वर पोचलो. मचाण बऱ्यापैकी स्थितीत होते. वरून वाड्याच्या चारही बाजूला लक्ष ठेवता येत होते. एका बाजूला वाहणारी नदी दिसत होती सगळीकडे जंगलाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. मात्र तिकडून एक पाऊलवाट असावी असे मात्र भासत होते. आता सायंकाळ झाली होती. मग आम्ही त्या मचानावरच आपला मुक्काम करायचे ठरवले. कारण त्या परिसरात तितकी सुरक्षीत अशी कुठलीच जागा दिसत नव्हती. मचाणावर कुठल्याही जनावरास चढणे शक्य नव्हते. मग आम्ही ते मचाण चांगले साफ सुफ केले. सोबत आणलेली चादर त्यावर पसरली. आणि जंगलाचे विलोभनीय दृश्य बघत गप्पा गोष्टी करत शिवा ने आणलेल्या न्याहारी चा आम्ही आस्वाद घेत बराच वेळ बसून राहिलो.
हळू हळू अंधाराचे साम्राज्य वाढत होते. पक्षी आपापल्या घरत्याकडे परतले होते. त्यांच्या चिवचिवण्याचा आवाज येत होता. हळूहळू तो आवाज शांत झाला आणि सम्पूर्ण परिसर आता एक वेगळ्या रुपात अवतरीत झाला होता. आकाशात चांदण्यांनी गर्दी केली होती. मधेच कोल्ह्याची कुई कुई ऐकू येत होती. कबुतरांची गुटूरगु ऐकू येत होती. तर मध्ये मध्ये वेगवेगळे जनावरांचे आवाज ऐकू येत होते. आमच्या डोळ्यावर झापेची गुंगी पसरत होती. तशातच आम्ही केव्हा झोपी गेलो ते कळलेच नाही.
रात्री अचानक गुरगुरण्याचा आवाज ऐकून मला जाग आली . मी अंधारात कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच लक्षात येत नव्हते आणि दिसतही नव्हते. शिरीष आणि शिवा तर मस्त घोरत पडलेले होते. मात्र त्या गुरगुरण्याचा आवाजाने माझी झोप पुरती उडाली होती. मचाणीच्या खाली उतरणे आता अति धोक्याचे होते. आता तिथे प्राण्यांनी आपला कब्जा केला होता. मध्ये मध्ये कधी चमचमणारे डोळे मला घाबरवत होते. पण त्याही परिस्थितीत आम्ही अगदी सुरक्षित आहोत ही भावना मला जास्त सुखाची वाटत होती.
आता गुरगुरण्याचा आवाज वाढला होता. कदाचीत दोन प्राणी आणलेल्या शिकारी साठी एकमेकांशी भांडत असावेत असे वाटत होते. मी डोळे फाडून पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मधेच मला वाटले टॉर्च काढून त्याच्या प्रकाश काय असावे ते बघावे. पण मग विचार आला जर ते आपली उपस्थिती पाहून जास्तच आक्रमक झाले तर, म्हणून मी माझ्या मनाला समजावून तो विचार काढून टाकला आणि तसाच पडून राहिलो. पण काही वेळानंतर माझे मलाच राहवले नाही मी शिरीष ला हळूच जागे केले. तोही मग त्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू लागला. आमची कुरबुर ऐकून शिवा ही जागा झाला.
तेवढ्यात कुणाच्या पावलांचा आवाज आमच्या कानी पडला. आम्ही तिघेही त्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करू लागलो. अंधारात काहीच अंदाज लागत नव्हता. पण कोणी तरी नदी च्या दिशेला जात असावे असा भास नक्कीच होत होता. आम्ही विचार करायला लागलो. कोण असेल इतक्या रात्री इथे या भयानक जंगलात. वाड्यात कोणी राहात असेल का. पण आपण आलो तेव्हा आपल्याला का कोणी दिसले नाही. इतक्या रात्री वाड्यात कशाला आला असेल. की आपण इथे आलेलो पाहून तोही आपल्याला भीती दाखवण्यास गावतलाच कोणी आपल्या मागोमाग आला असेल. मात्र आम्ही तिघेही आता थोडे घाबरलो होतो. पण कशाचाच अंदाज लागत नव्हता.
थोड्याच वेळात पाखरांची चिव चिव सुरू झाली. आता पहाट होत होती. आम्हीही आता उठून आजूबाजूचा अंदाज घेत होतो. मग आम्हीही ठरवले की चला खाली उतरून नदी कडे जाऊन यायचे. खालचा अंदाज घेऊन आम्ही मचानावरून खाली आलो. आणि तिघेही नदीच्या दिशेने चालायला लागलो. वाट काढत काढत आम्ही नदीवर पोचलो तर आम्हला आश्चर्याचा धक्काच बसला . एक साधू बाबा वाटणारा वृद्ध काठावर पद्मासन अवस्थेत बसलेला होता. त्याची दाढी जटा वाढलेल्या होत्या. कमरेला एक पंचा लावलेला होता. बाकी पूर्ण शरीर उघडे होते. बाजूला त्याची काठी पडलेली होती. त्याने आताच आपली आंघोळ करून ध्यान अवस्थेत तो बसला असावा. त्याला कशाचेच भय वाटत नसावे.
आम्ही त्यांचेच जवळ जाऊन पोचलो. ते मात्र आपल्या ध्यान क्रियेत पूर्णपणे मग्न होते.
आम्ही त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत बसलो. बऱ्याच वेळाने ते आपल्या ध्यान मुद्रेतून परत आले. मग आमच्याकडे बघत म्हणाले . कुठून आलात . आम्ही त्यांना आमचा परिचय दिला. तसे ते म्हणाले इतक्या घनदाट जंगलात येण्याचे काय प्रयोजन होते. आम्ही त्यांना आमच्या जिज्ञासे पोटी तिथे आल्याचे सांगितले. तसे ते म्हणाले. इथे जंगली जनावरांचा खूप वावर असतो. इथे येणे खूप धोक्याचे आहे. पण इथला निसर्ग खूप छान आहे. या निसर्गाच्या प्रेमापोटीच मी इथे थांबलो आहे. गेली कित्येक वर्षे मी इथेच राहतो.
मग त्यांनी आपली जीवनाची गाथाच आमच्या पुढे उघडली. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी घर सोडले. प्रथम भिक्षा मागून पोट भरायचे . पण लवकरच त्याचा कंटाळा आला. मग ते ऋषिकेश ला गेले. तिथे साधू संतांच्या सानिध्यात राहिले. शिक्षण वाचन खूप केले. मग ते भारत भ्रमणाला निघालो बरीच वर्षे भ्रमणात गेले. त्यानंतर हळू हळू शरीर थकायला आले. भ्रमण करता करता ते त्या भागात आले आणि तिथलेच झाले.
वाड्याच्या मागच्या भागाला एका खोलचा ते रात्री आडोसा घेतात. बाकी दिवस भर ते जंगलात फिरत असतात. जंगलातच काही खाण्या पिण्याचे शोधून त्यावरच ते आपले पोट भरत कंद मुळे पाने फळे फुले हाच त्यांचा आहार होता. कधी एखाद वेळी ते जवळपासच्या गावात जात . पण त्यांना परत इथली आठवण आली की ते परत येत.
इथेच जंगलात त्यांना राहायला आवडते. मोह माया राग लोभ क्रोध या पासून ते विरक्त झाले होते. तिथले प्राणी पक्षी झाडे झुडपेच त्यांचा परिवार झाला होता. त्यात ते खूप आनंदी होते. ते मूळचे कदाचित त्याच भागातले असावे . त्यांना आपले घर ,गाव नातेवाईक काहीच आठवत नव्हते.
मग आम्ही त्यांना विचारले की त्यांना एवढ्या दाट जंगलात भीती वाटत नाही का. तर ते म्हणाले. पोरांनो माणसा पेक्षा हे प्राणी, ही झाडं हा निसर्ग जास्त प्रेमळ आहे. आपण त्यांना जपलं की तेही आपल्याला जपतात. त्यांच्यापासून कशाचे भय.
आम्हालाही त्यांचे म्हणणे पटले. आपण बघतोच ना माणूसच माणसास लुटतो. एकमेकास मारायला धावतो. खून आत्त्याचार अनाचार समाजात किती वाढलाय. खरच होतं ते माणसांपेक्षा ही जनावरे जास्त प्रेमळ आणि चांगली असावीत.
मग साधुबाबाच आम्हाला जंगलात घेऊन गेले. त्यांनी तिथून काही फळं, कंद मूळ गोळा केली. परत आम्ही नदी काठी आलो. त्यांनी ते वाहत्या पाण्यात छान स्वच्छ केले . आम्हाला खाण्यास दिले. त्यांनीही ते आमच्या सोबत खाल्ले. खरच खूप रुचकर होते ते सगळे. मग आम्ही झाडाखाली बराच वेळ बसून राहिलो. झाडाच्या सावलीत गार गार वारा खूपच आल्हाद दायक वाटत होता. तिथली ती शुद्ध हवा पिऊन टाकवीशी वाटत होती.
नंतर मग आम्ही साधू बाबांसोबत जंगलात बरेच भटकलो. त्यांनी वेगवेगळी झाडे त्यांचे गुणधर्म, कुठल्या उपचाराला ते चालतात. त्यांना कधी फुलं फळं लागतात. अशी खूप काही माहिती सांगितली.
जंगलातल्या त्यांच्या वास्तव्याच्या काही घटनाही सांगितल्या. अशीच सायंकाळ होत आली. आम्ही रात्री मुक्काम करून परत एक दिवस थांबण्याचा आमचा मानस त्यांना सांगितला. त्यानाही आमच्या जंगल सफारी चा उत्साह बघून आनंद झाला होता.
मग त्यानी रात्रीच्या खाण्याची आमची व्यवस्था केली. मग आम्ही त्या वाड्यावर परत आलो. आम्ही रात्र त्यांच्या सोबतच त्यांच्या त्या खोलीत घालवली. मात्र आता आमच्या मनातले भय पूर्ण पणे निघाले होते. जंगली जनावरांपासून आपला बचाव कसा करायचा तेही त्यांनी आम्हाला सांगितले.
वैराग्यातही ते किती आनंदी आणि समाधानी होते त्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. वाडा सून सान असला तरी तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पण गेल्या कित्येक वर्षात तिथे भीती पोटी कोणीही येत नसल्याचे सांगितले.
भूत प्रेत पिशाच्च ह्या फक्त मनाच्या कल्पना आहेत. वास्तवात असलं काहीच या भूतलावर असेल असं त्यांनी कधीही अनुभवलं किव्वा बघितलं नव्हतं.
मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण अगदी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे विचार आम्हला पटत होते. अशाच गप्पा करत रात्री आम्ही झोपी गेलो.
रात्री अचानक मला जाग आली तर साधू बाबा खोलीत नव्हते. मी आजू बाजूला बघितले तर शिवा आणि शिरीष दोघेही घोरत पडलेले होते. मी दाराकडे बघितलं तर दार लावून होते . मला थोडी काळजी वाटली. मी दोघांनाही जागे केले. काय झाले, काय झाले करत दोघेही उठले. मी त्यांना साधुबाबा कुठे गेले दिसत नाहीत ते सांगताच तेही भानावर आले.
दार आतून तर बंदच होते. मग साधू बाबा जाणार कुठे आम्ही आता मात्र थोडे घाबरलो. मला दरदरून घाम फुटला. शिरीष ही खूप घाबरला.
मात्र शिवा शांत होता. त्याने मला आणि सुहासला पाणी दिले. आम्ही पाणी पिऊन परत विचार करायला लागलो. कुठे आणि कसे गायब झालेत हे साधू बाबा . आम्हाला कसे कळले नाही. ते या वाड्यात राहणारे भूत तर नसेल. नाना प्रश्न मनात येऊ लागले. म्हणजे काल आपण पूर्ण दिवस भुता सोबत घालवला . पण का ? का असे झाले. आम्हाला का कळले नाही. आमच्या लक्षात का आले नाही. मला तर पक्के वाटायला लागले की ते या वाड्यातले भूतच असावे. आणि म्हणूनच कोणीही या वाड्याकडे फिरकत नसावे.
पण मग
परत विचार आलेत, ते तर साक्षात आमच्या सोबत होते. बोलत होते, किस्से सांगत होते. त्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण इतिहास आम्हाला कथन केला होता. मग असं कसं होऊ शकते की ते असे अदृश्य होऊन जातील. काल जे दिवसभर आमच्यासोबत होते ते कोण होते. आमचे डोके तर पार फिरून गेले होते. मनात भीती भरली होती.
आता पुढे काय होणार याची चिंता चेहऱ्यावर दिसत होती. दार उघडून बाहेर बघण्याची पण हिम्मत होत नव्हती. आता पुढे काय करायचे काहीच सुचत नव्हते.
मीच मग शिरीशला म्हणालो, शिऱ्या बघ ना यार इथे कुठे काही गुप्त मार्ग किंवा भुयारी मार्ग तर नाही. कदाचित त्या मार्गाने ते बाहेर गेले असतील.
मी तसे काही दिसते का याचा शोधही घ्यायला लागलो. मी त्या रूमचा कोपरा नि कोपरा शोधून काढला पण कुठेच काही दिसत नव्हते. खोलीत फक्त एक भिंतीमध्येच काढलेली आलमारी दिसत होती. मी ती दोनदा तीनदा उघडून बघितली पण त्यात काहीच दिसत नव्हते. मग मला संशय आला की कदाचित एखादी भिंतच तो दरवाजा असू शकेल जे मागे पुढे होत असेल. मग मी भिंतींना ढकलून मागे पुढे होतात का ते पण करून बघितले. पण सगळी निराशाच पदरात पडत होती.
साधू बाबा कुठे गेले, कसे गेले, आम्हाला न सांगता का गेले काहीच समजायला मार्ग नव्हता. मग मात्र मी दार उघडून बाहेर बघायचे ठरवले.
आमच्या बॅग जशाच्या तश्या, जिथे ठेवल्या होत्या त्या तशाच तिथेच होत्या. मी बॅग मधून टॉर्च काढला आणी दार उघडले. मी दारात उभे राहूनच अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो. बाहेरही काहीच अंदाज येत नव्हता.
जर साधू बाबा मनुष्य आहेत तर ते इतक्या रात्री अदृश्य कसे होतील. याचा अर्थ हाच होत होता की ते कुणीतरी योग पुरुष असावेत किव्वा काही भुताटकीचा तो प्रकार असावा.
मग मी दार परत बंद करून घेतले. शिरीष पण पुरता घाबरून गेला होता. शिवा मात्र अजूनही शांतच दिसत होता. तो आमच्याशी बोलतही नव्हता. तो फक्त आमच्याकडे टक लावून बघत होता.
मग मलाच एक वेगळा संशय आला. हा शिवा आमची अशी मजा का बघतोय. त्याला नक्कीच साधू बाबांबद्दल काही तरी माहीत असणार. कदाचित साधुबाबांच्या कुठल्यातरी कटात तोही सहभागी असणार. पण मग मी तो माझ्या मनातला विचार काढून टाकला. कारण जंगलात निघताना तोही आमच्या इतकाच अनभीज्ञ होता.
तितक्यात दार वाजले. आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो. मग मात्र शिवा उठला आणि त्याने दार उघडले. आम्ही बघतो तर काय साधू बाबा दारात उभे होते. त्यांच्या हातात काही कंद मूळ फळं होती. ते आमच्या नाश्त्याची व्यवस्था करून परतले होते.
मग मात्र शिवा जोराजोरात हसायला लागला. आम्ही ते बघून परत घाबरून गेलो. मला तर वाटले साधू बाबा भूत आहेत. त्यांनी शिवाला संमोहित करून स्वतःच्या वश केले आणि आता, त्यानीच शिवा कडून ते दार उघडून घेतले. शिवा जोराजोरात हसतोय ते पण साधुबाबांच्याच प्रभावा मुळे. तो शांत होता तेही त्यांच्या प्रभावामुळेच असावे असेच मला वाटायला लागले.
मग मी आणखीच घाबरलो. आता तोंडातून शब्दही निघत नव्हते. सम्पूर्ण शरीर भीतीने हलायला लागले. घामाने मी ओला चिंब झालो. माझ्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती शिरीशची ही नव्हती.
आमची ती अवस्था बघून शिवाच बोलला. बाबा बघा दोघेही किती घाबरलेत. तुम्ही बाहेर गेलात तेव्हा हे दोघेही झोपलेले होते. म्हणून मी तुम्ही बाहेर जाताच दार आतून लावून घेतले आणि झोपून गेलो. पण मधेच विशाल जागा झाला, तुम्हला इथे नाही हे पाहून तो घाबरला. आणि आम्हाला जागे केले. मी त्यांची मग मजाच बघायची म्हणून काहीच बोललो नाही. तर यांचे विचार बघा कुठे कुठे जाऊन आलेत. त्यांनीं तुम्हला तर चक्क भूतच करून टाकले. आताही ते तुम्हला भूतच समजत आहेत.
मग मात्र साधू बाबांच्या चेहऱ्यावर हलके स्मित झळकले. ते म्हणाले पोरांनो तुम्ही झोपले होते. आणि मला प्रातःर्विधी करिता जायचे होते. म्हणून मी यालाच उठवून दार आतून बंद करून घ्यायला सांगितले. तुम्हा सगळ्यांची झोपमोड होऊ नये हीच माझी मनीषा होती.
चला विसरा सारे. आता प्रकाश होत आहे. आपण नदीवर जाऊन तयार होऊ या. आता भीती गेली ना तुमची. चला तर मग उठा.
मग आम्ही चौघेही नदीवर गेलोअंघोळ वैगरे करून तयार झालो. खूप प्रसन्न वाटत होते. साधुबाबांची ध्यान तपस्या आटोपली. मग आम्ही सकाळची न्याहारी फळावर करून साधुबाबांसोबत जंगल भ्रमणाला निघालो.
साधुबाबांसोबत आमचा वेळ खूप छान गेला. त्यांनी आम्हास जंगलातल्या खूप काही गोष्टी, झाडे ,पक्षी, पशु यांची ओळख त्यांची विशेषतः सगळे सगळे सांगितले. त्यांची घरटी दाखवली. अशीच मग दुपार झाली. आम्ही परत फळे, कंद, मुळे खाऊन आमचे पोट भरले व परतीला निघालो. साधुबाबा आम्हाला जंगलाच्या सीमेपर्यंत सोडायला आले. मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन गावात परतलो.
अजूनही मला ते साधुबाबा नेहमी आठवतात. परत एकदा त्यांना भेटावेसे वाटते. पण नंतर शिवाकडूनच कळले की मधे कधीतरी तो तिकडे जाऊन आला पण आता साधुबाबा तिथे नव्हते. ते कदाचित परत आपल्या भ्रमणास गेले असावेत.
नाहीच उरली माणुसकी असे आपण ठोसपणे नाही म्हणू शकत पण माणुसकीचा ऱ्हास झाला हे मात्र मान्यच करावेच लागते .प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. तो फक्त स्वतःच तेवढं बघतो. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही पातळीला जाण्यास तयार होतो. काहीही करण्यास तो मागे पुढे पहात नाही. भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचीही त्याला चिंता नसते. विचार असतो तो फक्त आजचा. आपल्या खिशाचा. आपल्या सुखाचा. भलेही ते सुख क्षणिक का असेना. आणि माणूस माणसालाच लुटायला निघतो. मग आपण सहजच म्हणून जातो, माणूसकीच उरली नाही.
अशीच एक ही कथा आहे माणुसकीची, आमच्या सदाशिवाची.
छोट्याश्या गावात राहणारा सदाशिव. घरात म्हातारे आई वडील , दोन बहिणी, दोघीही लग्नाच्या. बायको आणि दोन शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं. घरात तो एकटाच कमावता. घरी चार एकर जमीन तीही नेहमीच ऐन वेळेवर धोका देणारी. सदाशिव कसा बसा संसाराचा गाडा ओढत होता. त्याच्या कष्टाची तर सीमाच नव्हती. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचे अमाप कष्ट चालत असत. कधी आपल्या शेतातले काम सोडून कुणाच्या दुसऱ्याच्या कामालाही जावे लागे. तेवढीच प्रपंचाला मदत होत असे. सोबतीला आई, बायको, बहिणी ही राबायच्या. पण परिस्थितीत काहीही फरक पडत नव्हता. दिवसेनदिवस सदाशिवची परिस्थिती खराबच होत चालली होती. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. बियाणे, खते, औषध यांच्या किमती वाढतच चालल्या होत्या. कर्जा शिवाय तर शेती करणेच कठीण होते. आधीच पैशाची तंगी. त्यात काही आगाऊचा खर्च आला तर सावकारा शिवाय काहीच पर्याय नसायचा. शेतात मजुरीचा खर्च तर न झेपणाराच होता. आणि पीक मात्र हमखास धोका देऊन जायचे. कधी पावसाचा मार, कधी पुराची धार. कधी कीटकांचा हल्ला तर कधी सगळे बरोबर असताना मालाच्या किमतीवर व्यापाऱ्यांची चालायची कुऱ्हाड. दाम मिळत नाही बरोबर. सगळीकडून शेतकऱ्यावरच पडतो मार .
सदाशिव बहिणींच्या लग्नासाठी खूपच काळजीत होता. बहिणी पाहायला बऱ्या असून सुद्धा हुंड्या पाई लग्नच जुळत नव्हते. बहिणींचे वय वाढत होते. जसजसे दिवस जात होते तसतसे सदाशिवची श्वासांची गतीही वाढत होती. काय करावे कुठून आणावा हुंड्याचा पैसा काही उपायच दिसत नव्हता. लग्नालाही खर्च लागणारच होता. दोघींचेही लग्न सोबत जुळवून एकाच मांडवात झाले तर ते त्याला परवडणारे होते. पण नशिबाने तशी साथ मिळायला हवी होती.
अचानक एक दिवस बाबाराव निरोप घेऊन आले. उद्या पाहुणे येणार. मुलगा नागपूरला नोकरी करतो. एक छोटा भाऊ आहे. तोही नागपूरलाच नोकरी करतो. सदाशिवला आशेचे किरण दिसले. त्याने पाहुण्यासाठी चहा पोहे ची व्यवस्था करून ठेवली. आजूबाजूच्या खुर्च्या जमा केल्या. घर छोटे असल्याने अंगणातच बसायची व्यवस्था केली. हे स्थळ आता जाऊ द्यायचे नाही असा पक्का निर्णय केला. घरातही त्याने सगळ्यांना बजावले. सगळं वयवस्थित व्हायला पाहजे. कोणत्याही परिस्थितीत लग्न जुळलेच पाहिजे.
दुसऱ्या दिवशी पाहुणे पोचले. चहा, पोहे आटोपले. पहाणीचा कार्यक्रम आटोपला. पाहुण्यांनी आपली पसंती दर्शवली. पुढची बोलणी सुरू झाली. मुद्दा हुंड्यावर आला. मूलाकडच्यानी पाच लाखाची मागणी केली. सदाशिवला तर घामच फुटला. त्याला काय बोलावे सुचेच ना. त्याने पाहुण्यापुढे हात जोडले आणि म्हणाला. भाऊ साहेब माह्या परिस्थितीचा थोडा इचार करा जी. इतका पैसा कुठून आणीन मी. माह्या बहिणीले पदरात घ्या. जे काही होईन थे मी करतो जी. पर इतका पैसा कसा जमन , थोडा इचार करा भाऊ साहेब. मले अजून एक जबाबदारी पार पाडाची हाये. थे बी पाहा लागण जी. महावर उपकार करा जी, जन्मभर मी तुमचा दास होऊन राहीन जी. सदाशिवची ती लाचारी बघून घरात आई, बहिणी, बायको सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. मुलाकडचे काहीच ऐकायला तयार नव्हते. ते पाच लाखावर अडूनच बसले होते. सदाशिवने मग आशाच सोडली. आणि मग तो पाहुण्यांना म्हणाला जाऊ द्या भाऊसाहेब नशिबात जे असं ते होईन. मी दीड लाख देईन, कसही करून मी एवढं जमवतो, पण या उपर काही मी काही देऊ शकत नाही. बसा चहा घ्या आन मग निघा पायजे त , असे बोलून त्याने घरात परत चहा ठेवायला सांगितले. त्याचे निर्वाणी चे शब्द ऐकून मुलाकडचे लोक गोंधळले. त्यांना पण वाटायला लागले आता सोयरीक तुटते. सगळे चूप होते. तेवढ्यात चहा आला. चहा होताच सदाशिवने पान सुपारी समोर केली. आणि पाहुण्यांना हात जोडले. कुणाच्याच तोंडातून शब्द निघत नव्हते. शेवटी सदाशिवचा दोस्त मधुकर बोलला. पहा भाऊसाहेब पैसा काय आज येईन उद्या जाईन, पर सबंध झाला त थो आयष्यभर राहीन, इचार करा तुम्ही. म्हणत असान त कुंकू बलावतो. पोराले कुंकू लावून टाकू. मंग आरामात लग्नाची तारीख काढत राहू. सगळे एकमेकांकडे बघत होते. कोणीच बोलत नव्हते. मग मधूकरच बोलला, सदा बोलाव गा कुंकू. मग मुलाला टिकला लागला. लग्न पक्के झाले.
मग पाहुण्यांनीच एक अजून प्रस्ताव पुढे केला , तुमची लहान बहीण आमच्या लहान पोराले दाखवा, जमलं त इथंच दुसरं बी फायनल करून टाकू. तसा सदाशिव घरात गेला आणि आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन आला. लहान मुलाची मुलीची पसंती झाली. परत गोष्ट हुंड्यावर आली. तसा मधूकरच बोलला, जे सदान मोठ्या बहिणीले दिलं तेच छोटी ले बी देइन. सांगा लावाचा का टीका. परत कोणी बोलत नव्हतं. सगळे शांत झाले होते. मग मधुकर स्वतःच बोलला आणा कुंकू , हे बी फायनल करून टाकू. सदा आन भाऊ कुंकू. मग लहान मुलाला पण टीका लागला. एकाच बैठकीत, एकाच घरात दोन्ही बहिणींचे लग्न जुळले. सदाशिवला आनंद तर झाला पण मोठी चिंताही लागली. एवढे पैसे आणायचे कुठून तीन लाख हुंड्याचे आणि कमीतकमी दोन लाख बाकीचा खर्च. सगळं मिळून पाच लाख लागणार होते. पाहुणे परत जाताच सदाशिव तर डोकेच धरून बसला.
पैशाच्या जमवाजमविचा हिशोबच लागत नव्हता. सदाशिवला काहीच सुचत नव्हते. आधीच सावकाराचे देणे बाकी होते. आता परत तो कसा देईल ही चिंता होती. घरात तर एकही पैसा नव्हता. बायकोचे काही दागिने होते, त्यांची किंमत किती होईल ते बघायला पाहिजे होते. काही दोस्त मित्र थोडी मदत करतील पण त्यांचेही पैसे मग परत करावे लागतील. सदाशिवला खूपच चिंता लागली होती. त्याला रात्री झोप सुद्धा लागत नव्हती.
हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला. मुलाकडे तीन लाख पोचले होते एक लाख देणे बाकी होते.कपडे, किराणा, मंडप डेकोरेशन सगळंच उधारीत होत. लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलाकडून फोन आला. ते पैशाची चौकशी करत होते. सदाशिव लाचारीने त्यांना थोडं थांबायचं सांगत होता. पण ते लोक ऐकायलाच तयार नव्हते. हुंड्याची रकम पूर्ण दिली नाही तर दोन्ही नवरदेव मांडवात येणार नाही असे सांगत होते. सदाशिवला मार्गच दिसत नव्हता. तो परत सावकाराकडे गेला. सावकाराने पिकासकट जमीन गहाण करण्याचा सल्ला दिला. सदाशिवचे मन तयार होत नव्हते. पण दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता. त्याने सावकाराकडे शेवटी शेती गहन केली आणि पैसे घेऊन मुलाकडे पोचला. पैसे देऊन परत आपल्या गावाकडे निघाला. पण त्याला घरी जायचीच इच्छा होत नव्हती. आता घरी काय सांगायचे हा प्रश्न त्याला पडला शेती गहाण झाली. यंदाचे तोंडावर आलेले पीकही सावकार नेणार. मग करायचे काय. बाकी देणे कुठून पूर्ण करायचे . काहीच सुचत नव्हते. सदाशिव कसा बसा घरी पोचला. शरीरात ताप भरला होता. लग्न दोन दिवसावर होते. त्याने सगळा धीर एकवटला आणि तयारीला लागला.
लग्न पार पडले. बहिणी सासरी गेल्या . आणि सदाशिवचा ताप अंगावर निघाला. तो तीन दिवसांपासून बेशुद्ध पडला होता. कशाचीच शुद्ध नव्हती. घरात आई वडील बायको मुलं सगळे चिंतेत होते. सदाशिवला दवाखान्यात नेणे आवश्यक होते. पण घरात तिकिटाचेही पैसे नव्हते. सदाशिव खाटेवर निश्चल असा पडलेला होता. बायको सारखी रडत होती. शेवटी तिनेच लग्न झालेल्या आपल्या नंदेला फोन लावला. आणि सदाशिवचे काही खरे नाही. तुम्हा बहिणींना शेवटचे भेटायचे असेल तर जशा आहात तशा निघा आणि पोहचा. बहिणींनी त्यांच्या घरी सगळी हकीकत सांगितली. सगळे सदाशिवला भेटायला निघाले . मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचे मन द्रवले. त्याने सोबत डॉक्टर ला घेतले. डॉक्टर ने ही चौकशी करून औषध सोबतच घेतले. सगळे सादाशिवच्या घरी पोचले. सदाशिव बेशुद्धच होता. डॉक्टरने ताबडतोब आपला उपचार सुरू केला , सलाईन लावले. आता थोडी सदाशिवची हालचाल होत होती. पण अशक्तपणा खूप आला होता. पण सदाशिव मरणाच्या दारातून परत आला होता. मूलाकडच्यानीच सगळी चौकशी करून . सावकाराचे सम्पूर्ण देणे फेडले आणि शेताचे गहानपत्र परत आणले. ते सदाशिवला ला देऊन आपण केलेल्या चुकीची माफी मागितली.
सदाशिवचे संकट कमी झाले होते. त्याला दोन्ही जावई देवच वाटायला लागले होते. Sanjay Ronghe Nagpur
चंद्रा , नावाप्रमाणेच सुरेख दिसायची ती. रूप रंग छानच होता. स्वभावाने साधी, सरळ मनमिळावू . कुणाला घालून पाडून बोलणे तिला कधी सुचयचेच नाही. कुणी काही बोललं, रागावलं, तर सगळं निमूट पणे ऐकून घ्यायची. डोळ्यातली आसवं पुसून परत आपल्या कामी लागायची. इतरांच्या वागण्याचे दुःख व्हायचे पण ती सगळं निमूटपणे सहन करायची. थोड्याच वेळात सगळं विसरून जायची. नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायची. पण तिच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदाही घेणारे खूप असायचे. त्यासाठी ती आपल्या नशबालाच दोष द्यायची. म्हणायची देवानं माझा स्वभावच असा बनवला तर त्यात माझा काय दोष. माझ्या नशिबात जे जे असेल ते सगळं मी सहन करायला तयार आहे. होऊ दे जे व्हायचं ते. मी करील सगळं सहन.
आई वडील ही तिचे गरीबच होते. मजुरी करून कसे बसे पोट भरायचे. परिस्थितीनुरूप त्यांनी तिचे लग्न सर्वसाधारण घरात दिनकर रावाशी करून दिले. दिनकररावचे स्वतःचे छोटेशे किराणा दुकान होते. दुकान बऱ्यापैकी चालत असल्याने घर व्यवस्थित चालायचे. प्रपंच चालून थोडी बचत पण व्हायची. दिनकरराव कधी बाहेर कामानिमित्त गेले तर चंद्रा दुकान सांभाळायची. त्यामुळे दुकान असे कधी बंद राहत नसे. त्यामुळे दुकानात काही स्थायी ग्राहक तयार झाले होते.
घरात सासू सासरे एक नणंद आणि हे दोघे. असा पूर्ण भरलेला परिवार होता. नणंदेचे लग्नाचे वय झाले होते. दिनकररावनी एक साधारण घरातला मुलगा शोधून तिचे लग्न करून दिले. ती पण आता सुखात होती. सासू सासरे म्हातारे असल्याने त्यांचा सम्पूर्ण भार दिनकररावावरच होता.
होता होता त्यांच्या सुखी संसारात दिनेश आणि राजेश या त्यांच्या दोन मुलांचे आगमन झाले. हळू हळू मुलं ही मोठी होत होती. दुकानाची भरभराट होत होती. आता दुकान थोडे मोठे झाले होते. तीन चार माणसे दुकानात कामाला होती. पैशाची आवक वाढली होती. अचानक एक दिवस थोड्या आजाराने सासरे वारले. त्यांच्या पाठोपाठ सासूही वारली. आता घरात चारच लोक उरले होते. दोन्ही मुले हळू हळू मोठी होत हाती. मुलांचे करता करता चंद्रा दिवसभरात थकून जायची. मुलं मात्र खूप हट्टी आणि जिद्दी होती. चंद्राला ते खूप त्रास द्यायचे. त्याचा चंद्रा ला खूप त्रास व्हायचा. पण ती सगळा त्रास सहन करायची. म्हणायची आपलेच दात आणि आपलेच ओठ, जे नशिबात आहे ते तर भोगायलाच पाहिजे. नवऱ्याच्या चांगल्या स्वभावामुळे ती आपले दुःख विसरून जायची. दिनकरराव चा पूर्ण दिवस दुकानातच जायचा. त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. त्यामुळे त्यांचे मुलाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे मुलं कसेबसे चढत उतरत दहावा वर्ग पास झाले. पुढे कॉलेजच्या नावा खाली ते नुसते भटकत असायचे. अभ्यासाचे तर नावच घेत नसत. त्यांची मित्रांची संगतही ठीक नव्हती. हळूहळू मुलं बिघडतच गेली. दिनकर राव मुलांच्या वागणुकीने कंटाळले होते. शेवटी त्यांनी दोघांनाही दुकानात मदती साठी घेतले. पण दुकानातही ते कधी आले तर आले, नाही तर काही बाही कारण सांगून गायब व्हायचे. मुलं पुरते बिघडले होते. दिनकररावांना काय करावे ते कळतच नव्हते.
आता वयोमानाप्रमाणे दिनकर रावनाही दुकानाचा व्याप सांभाळणे कठीण होत होते. मुलांची सदा काळजी लागली असायची. सकाळी घरातून गेलेली मुलं रात्री केव्हा परत यायची ते कळत नव्हते. दुकानात यायचे ते फक्त गल्ल्यातून पैसे घ्यायसाठी तेवढे यायचे. एकदिवस अचानक दिनकररावना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते निघून गेले.
आता सगळा भार चंद्रावरच येऊन पडला. चंद्रा एकटी पडली होती. तिला घर बघू की दुकान बघू की काय बघू असे होऊन गेले. हळू हळू दुकानाची व्यवस्था कोलमडायला लागली. जेही दुकानातून पैसे यायचे ते मुलं भांडण करून घेऊन जायचे. आता ते फक्त पैसे घेण्यासाठी तेवढे घरी यायचे. पैशाच्या अभावामुळे दुकानात माल भरणे पण कठीण झाले होते. जुन्या घेतलेल्या मालाची उधारी वाढत होती. त्यामुळे नवीन माल द्यायला कोणीच तयार नव्हते. मुलांना काही सांगायला जावे तर तेच तिच्यावर आरडाओरड करायचे. सगळे दुकान तुझ्यामुळेच बसले असा दोष तिला द्यायचे. घरात खूप भांडण करायचे. तिला मारहाण करायचे. त्यामुळे चंद्राची मानसिक स्थिती ही बिघडत चालली होती. त्यात देणेदार वसुली साठी सारखे चकरा लावत होते. देणेदारांची रक्कम वाढतच होती. त्यांचा तगादा आता सहनशक्ती च्या बाहेर झाला होता. शेवटी व्हायचे तेच झाले. देणेदाराने घर आणि दुकानावर कब्जा केला. चंद्रा बेघर झाली. तिचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडले. कोणीच तिला आधार द्यायला तयार झाले नाहीत. आणि चंद्रा रस्त्यावर आली. मुले तर केव्हाच गायब झाले होते. त्यांना कशाचीच काळजी नव्हती. त्यांच्यात माणुसकीच उरली नव्हती.
चंद्रा आता रस्त्याच्या कडेला कुठे तरी बसून रहायची. तिला कशाचेच भान उरले नव्हते. कुणी काही दिलं तर खायची नाही तर उपाशी तशीच शून्यात नजर लावून बसून रहायची. भिकार्याहूनही वाईट स्थिती तिची झाली होती. तिचे दोन दोन मुले असून सुद्धा ती बेवारस झाली होती. आजाराने पछाडली होती. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. कित्येक दिवसात तिने आंघोळ बघितली नव्हती. शरीरावर मातीचे थर जमा झाले होते. अंगावरचे कपडे जीर्ण झाले होते.
थंडीचे दिवस होते ते. एक समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते गरिबांना, बेवारस लोकांना ब्लॅंकेट वाटपाच्या कार्याला रात्री निघायचे आणि गरजूंना ब्लॅंकेट वाटायचे. अशाच एका कार्यकर्त्याच्या दृष्टीस चंद्रा पडली. त्याने आपल्या इतर मित्रांना तिची ती हकीकत सांगितली. शेवटी संस्थेने निर्णय घेतला आणि तिला तिथून उचलून आणले. तिची आंघोळ करून नवीन कपडे तिला घातले. डाक्टर कडे नेऊन इलाज करवला आणि तिला वृद्धाश्रमात पोचवले. त्यासाठी लागणारी सर्व करवाई त्या संस्थेनेच केली. आज आता चंद्रा वृद्धाश्रमात कुठेतरी कोपऱ्यात शून्यात नजर लावून आपल्या मुलांची वाट बघत बसलेली असते. कधी येतील तिची ती मुलं.
नितु आता आपले उच्च शिक्षण आटोपून अमेरिकेला एक मोठ्या कँपनी मध्ये जॉईन झाला होता. मीतू पण आपले शिक्षण सम्पवून लग्न करून ऑस्ट्रेलियाला सेट झाली होती. नाईक ही रिटायर्ड झाले होते. त्याना पेन्शन बरीच मिळत होती. राणी आणि नाईकांचे दिवस ही कधी अमेरिका कधी ऑस्ट्रेलिया तर कधी भारतात निघत होते. मुलांचे सुख बघून राणी आणि नाईक निश्चिन्त झाले होते. त्यांचेही म्हातारपणाचे दिवस आता आनंदात निघत होते. दोघांनाही एकमेकांचा आधार होता. मधे मधे नाईकांची बहीण सारीता ही येऊन जायची. तिला वाटलं तर चार दिवस ती पण नाईकांकडे राहून जायची. तिचे मिस्टर गेल्या पासून ती एकटीच झाली होती. तिचा मोठा मुलगा तिथल्याच कॉलेज ला प्रोफेसर झाला होता. तोही आपल्या संसारात खुश होता. नाईकांना अडीअडचणीच्या वेळी मदत करायचा .नाईकांना त्याचा खूप आधार होता. ताईचा छोटा मुलगा मुंबई ला नोकरीला होता. तोही सुट्ट्यांमध्ये येऊन जायचा. येकून सम्पूर्ण कुटुंब व्यवस्थित सेट झालं होते. सगळेच आपल्या संसारात खुश होते.
नाईकांना आता कशाचीच चिंता उरली नव्हती. पुढल्या आठवड्यात दिवाळी येणार होती. दिवाळी साठी नितु अमेरिकेहून सुट्ट्या घेऊन येणार होता. त्याने मीतूला तसे कळवले होते. मीतू पण येण्यासाठी प्रयत्न करत होती. अगदी वेळेवर तिच्या सुट्ट्या मंजूर झाल्या होत्या आणि तिचे येण्याचे तिकीट कन्फर्म झाले होते. दिवाळीला सम्पूर्ण कुटुंब एकत्र येणार होते. राणी खूप खुश होती. तिची दिवाळीच्या तयारी साठी धावपळ सुरू होती. नितुला काय काय आवडते मितूला काय काय आवडते आता राणीला चांगलेच माहिती होते.दोघांच्याही आवडीचे सारे पदार्थ राणीने करून ठेवले होते. वारंवार फोन करून नितु मीतूला सारखे विचारत होती आता निघायला किती दिवस उरलेत, कधी निघणार, कधी पोचणार. तिला मुलं कधी येतील आणि कधी मी त्यांना बघेन असे झाले होते.
दुपारी काम आटोपून राणी नाईकांसीबत गप्पा करत बसली होती. तितक्यात सरिता चा आवाज आला राणी राणी. राणीने उठून दार उघडले. सरिता आत आली. ती नाईकांकडे बघत म्हणाली दादा मी सगळे ठरवले. तुला आता काळजी करायची बिलकुल गरज नाही. नाईकांना काहीच कळले नाही. ते म्हणाले अगं कशाबद्दल बोलत आहेस. तशी सरिता बोलली अरे ते पाटील आहेत ना त्यांची मुलगी निशा आपल्या नितु साठी परफेक्ट मॅच होईल. मी तिच्या आई बाबांशी बोलून आले. आपला नितु त्यांना पसंत आहे. आता नितु आला की दोघांची भेट करवून देऊ. त्यांचा होकार झाला की . ताबडतोब मुहूर्त काढून बँड वाजवून टाकू. नाईकांच्या अर्ध्या चिंता त्यांची बहीण सारिताच पार पाडत होती. नाईकांनाही ते प्रपोजल खूप आवडले.निशा पाहायला सुंदर होती. पोस्ट ग्रॅज्युएशन आताच पूर्ण झाले होते . ती नितु साठी अनूरूपच होती. नितु मीतू सोमवरला पोचणार होते. आज रविवार होता. राणीची दिवाळीची सगळी तयारी झाली होती. आता मुलांचीच तेवढी कमी होती. सोमवार उजाडला सकाळी सकाळीच नितु मीतू दोघेही घरी पोचले. नितुने बाहेरूनच राणी ला आवाज दिला आई आई अगं कुठे आहेस, बघ आम्ही आलो आहेत. तशी राणी ने दार उघडले . तिने दोघांनाही जवळ घेतले. मीतू चा नवराही आला होता. तो पण खूप स्मार्ट उंच पुरा हँडसम होता. फक्त तो शांत स्वभावाचा होता. सगळे आत आले. राणीने त्यांना चहा दिला. चहा पिऊन सगळे फ्रेश झाले. फराळ आटोपला. राणीने जेवणाची तयारी केली. तोवर सारिताही आली. दुपारी पाटलांच्या घरी जायचे होते. निशाला बघायला. जेवण करून थोडा आराम झाला. मग सगळे निशाला बघायला पाटलांच्या घरी पोचले. निशाला बघून नितु अगदी खुश झाला. त्याला निशा आणि निशाला नितु पसंत आले. सहीच दिवसांनंतरचा मुहूर्त काढून लग्नाचा दिवस पक्का झाला.
आता दिवाळी आटोपली नितुचे लग्न आटोपले. निशा चा व्हिसा मिळायला तीन महिने लागणार होते. म्हणून नितु एकटाच अमेरिकेला निघून गेला होता. निशा राणी सीबत च राहत होती. दोघी सासू सुना असूनही माय लेकी इतके प्रेम त्यांच्यात जुळले होते. तशातच एक दिवस नितु चा फोन आला. त्याच्या कम्पनीने त्याला भारतातच ट्रान्स्फर दिली होती. तो आपल्या घरीच राहून भारतात कंपनीचे भारतातले त्यांचे ऑफिस त्याला सुरू करायचे होते. आणि सम्पूर्ण भारतात कंपनीचा बिझनेस डेव्हलप करायचा होता. जवाबदारी मोठी होती पण ते चॅलेंज नितु ने स्वीकारले होते. नाईक राणी निशा सरिता आता खूपच खुश होते. Sanjay R.
राणी वडील गेल्या पासून थोडी शांत झाली झाली होती. तिला सारखी आई आणि वडील यांची आठवण यायची. वडिलांचे विक्षिप्त वागणे आई चा आजार. सम्पूर्ण कुटुंबाची होणारी परवड. उपाश्यापोटी ते काढलेले दिवस. सारच तिला आठवायचं. मग ती अजूनच अस्वस्थ व्हायची. वडील का तसे वागत होते. याचे ती उत्तर शोधायचा प्रयत्न करायची. पण ते एक नेहमीसाठी तिच्यापुढे प्रश्नचिन्ह होऊन पुढे राहायचे. कोणी काही सांगेल का ते तसे का होते. जर ते तसे होते तर मरताना इतके प्रेमळ मायाळू का वागले. का आपली इतकी आठवण करत होते. आपली भेट होईपर्यंत ते कुठली आस मनात ठेवून ते जिवंत होते. आपली भेट होताच आपल्या मांडीवरच त्यांनी का प्राण सोडले. विविध प्रश्न तिच्या डोक्यात गुंता करत होते. उत्तर तिलाही माहीत नव्हते. आई ही तिच्याशी बा बद्दल कधीच काही बोलली नव्हती. आई आणि बा कधीच त्याना तिने सोबत बसून बोलताना बघितले नव्हते. बा फक्त झोपायला तेवढा घरी यायचा. सकाळ होताच निघून जायचा. परत यायचा तो दारूच्या नशेतच असायचा. का तो असे करायचा. राणीला काहीच कळत नव्हते, सुचत नव्हते. तिने आपल्या मनातले सारे प्रश्न नाईकांकडे मांडले. नाईकांनाही ते एक कोडेच वाटले. त्यानी राणीला समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणाले. राणी विसर आता सगळं. त्यांचं आयुष्य ते जगलेत. तुझ्यापुढे आता भविष्य आहे. ते तू आनंदात काढ. तसेही ते दोघेही आता जिवंत नाहीत तुला उत्तर द्यायला. का स्वतःला असा ताप करून घेतेस. आठवण येणे तर स्वाभाविकच आहे परंतु, सारखा तोच तो विचार करणे बरे नाही. तू स्वतःच आजारी पडली तर मग आमच्याकडे कोण बघणार. खरच आता तू ते सगळं विसरून जायला हवे. नाईकांचे ते बोलणे राणीलाही सुटायचे. ती मग त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्नही करायची. पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तिला तो तिच्या बा चा शेवटचा क्षण आठवायचा आणि मग ती त्या सगळ्या विचारात गुरफटून जायची.
बा च्या तेराव्या दिवसाला तिने नैवेद्य काढून गाईला अर्पण केला. पूजा केली. नाईकांनी काही वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या साऱ्या वस्तू ती त्या राहत असलेल्या गरिबांना वाटायला घेऊन जाणार होती. नाईक त्यासाठी आज ऑफिसमधून लवकर घरी परत येणार होते. ती नाईकांची वाटच बघत होती. तेवढ्यात नाईक आलेत. दोघेही मिळून ते साहित्य घेऊन तिच्या त्या घराच्या भागात पोचले. त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्या वस्तू तिथल्या लोकांना वाटून दिल्या. बा चा निरोप घेऊन येणारे ते गृहस्थही तिला भेटले. तिने त्यांना कधीतरी वेळ मिळेल तेव्हा घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि ते दोघेही घरी परत आले.
आज तिला थोडे बरे वाटत होते. ती तिकडे राहत असताना तिथल्या लोकांनी तिच्या बा आईला जी मदत केली होती. तिला तिथे जे प्रेम मिळाले होते त्याची परतफेड तर शक्य नव्हती, पण तिनेही त्यांच्यासाठी काही केल्याचे समाधान तिला वाटत होते. तिथे राहणारी सगळीच कुटुंब गरीब रोज दिवसभर कष्ट करून पोट भरणारी होती. त्यामुळे त्यांना दिलेल्या त्या वस्तू त्यांच्या कामात येणार होत्या. तिचे सम्पूर्ण बालपण तिथल्या त्या लोकांच्या सानिध्यातच गेले होते. तिथले लोक सगळे गरीब जरूर होते. पण वाईट बिलकुल नव्हते. त्यानाही आपला आत्मसन्मान खूप मोठा वाटायचा. त्यासाठी ते स्वतःला खूप जपत होते. तेच संस्कार राणी ला मिळाले होते . कष्ट इमानदारी आणि आत्मसंमान सगळेच गुण राणीने पूर्णतः अंगिकारले होते.स्वभाव तर मुळातच तिचा शांत,साधा, सरळ, सालस होता. नाईकांना म्हणूनच राणी आवडत होती.
हळू हळू दिवस जात होते. आता राणीही आई वडिलांचे दुःख विसरत होती. घरात कामाच्या व्यापात तिचा वेळ कसा निघून जायचा ते तिला कळत नव्हते. नाईक आणि मूलं ही आता राणी सोबत छान मिक्स झाले होते. आता सगळे व्यवस्थित सुरू होते. असेच एक दिवस सायंकाळी सगळे आनंदात गप्पा करत होते. तेवढ्यात दरवाजावर खटखट झाली. राणीने दरवाजा उघडला तर तेच गृहस्थ दारात उभे होते. त्यांनीच राणीच्या वडिलांचा शेवटचा निरोप आणला होता. तोवर नाईकही दारात आले. नाईकांनी त्याना घरात बोलवले. राणी त्यांच्या साठी चहा ठेवायला आत गेली. नाईकांनी त्यांना बसवले आणि येणाचे कारण विचारले. त्यांनी सांगितले काही कामा निमित्त ते त्या भागात आले तर राणी ची आठवण झाली म्हणून सहज आल्याचे सांगितले. नाईक त्यांच्या सोबत गप्पा करत होते. तेवढ्यात राणी त्यांच्याकरिता चहा घेऊन आली. त्याना राणीला बघून बरे वाटले होते. मग राणीनेच त्यांना विचारले काका मला एक प्रश विचारायचा होता. विचारू की नको सुचत नाही आहे. मला विचारायचे होते की माझे बा असे का वागायचे ते घरी कधीच नव्हते बोलत फक्त रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे असे का करत होते ते. आणि आई माझ्यावर खूप प्रेम करायची पण बा त्याने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही कधी बोलत पण नव्हता. पण अंत समयी काय झाले की तो मला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देऊन गेले.
राणीचा प्रश्न ऐकून त्या गृहस्तांचे डोळे पाणावले. राणी बेटा तू एक वर्षाची असतानाची गोष्ट असेल. बेटा तुझी एक बहीण होती. ती तुझ्या पेक्षा मोठी होती दोन वर्षांनी. तुझे बा चांगल्या नोकरीत होते. घर दार सगळंच चांगलं होत. पण एक दिवस तुझे बा तुझ्या बहिणीला घेऊन कुठे बाहेर निघाले होते. ती त्यांचा हात पकडून चालत होती. पण अचानक तिने त्याचा हात सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या फुगे वाल्याकडे धाव घेतली आणि नेमक्या त्याच वेळी येणाऱ्या बस ने तिला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तुझ्या बा ला त्याचे खूप दुःख झाले इतके की त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्या दिवसापासून तो कधीच एकही शब्द बोलला नाही. त्याची वाचाच गेली. नोकरी गेली पैसा सम्पला. मग ते इकडे आमच्या भगत रहायला आले. या दोन्ही घटनांचा तुझ्या आईवरही फरक पडला ती पण आजारी राहायला लागली. तरी त्या माउलीने सगळे सांभाळले. तुला मोठे केले. तुझा बा बघ संतुलन गमावलेले असतांनाही शेवटी मात्र त्याला तुझी आठवण झाली आणि घरी परत आला. सारखे तुला आठवत राणी राणी करत होता. बेटा बरेच झाले. तू येऊन त्याला जवळ घेतलंस. मुक्त झाला तो या जन्मतून. नाही तर त्याचा आत्मा तुझ्यासाठी भटकत राहिला असता.
ती गोष्ट ऐकून राणी खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून आसवे गळत होती. बराच वेळ झाला होता. ते काका आता निघून गेले होते. राणीला आता खूप बरे वाटत होते कारण तिचे बा या जन्मतून मुक्त झाले होते. Sanjay R.
आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे. राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.
राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.
आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले . तर समोर तिच्या जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.
राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.
नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत संस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते. Sanjay R.
जसजसे दिवस जात होते राणी बद्दलची मुलांच्या मनात धुसफूस वाढतच होती. राणी आपल्या परीने मुलांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्यात ती असफलच होत होती. आज सकाळचीच गोष्ट बघा. मीतू ला आज शाळेला एक तास अगोदर जायचे होते पण त्याची कल्पना तिने राणीला दिलीच नाही. ती राणीला सांगायला विसरली. मग मात्र वेळेवर तिची खूप घाई झाली. राणीला पूर्व कल्पना नसल्याने ती आपल्या नेहमीच्या गतीने घरातली कामे करत राहिली. मीतूचा टिफिन, युनिफॉर्म प्रेस करणे, शूज पोलिश सगळेच व्हायचे होते. वेळ झाला असल्याने मीतू मग चीड चीड करायला लागली. ती राणीला म्हणाली बघ आई आता मला तुझ्यामुळेच वेळ होत आहे, माझा टिफिन, स्कुल बॅग, युनिफॉर्म, शूज तू काहीच तयार करून ठेवलं नाहीस. टीचर उशीर होण्याचं कारण विचारतील तर मी तुझंच नाव सांगणार. तूच मला तयार केलं नाहीस. आता लेट तर नक्कीच होणार. तू नेहमी अशीच करते. आमच्याकडे लक्षच देत नाहीस. नेहमी आपलीच कामं करत असतेस. आम्हाला मुळीच मदत करत नाही. तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. पप्पा बघा ना आता मला किती वेळ होणार, आज टीचारनी एक्स्ट्रा क्लास साठी एक तास अगोदर बोलवले, पण आईने माझे अजून काहीच करून दिले नाही. मी आता आईमुळेच लेट होणार. सांगा ना तिला काही. ती आमचे काहीच ऐकत नाही.
मीतूचे बोलणे ऐकून नाईकांच्या मनातही राणी बद्दल थोडा रोष निर्माण झाला. मात्र तिकडे राणीची सारखी धावपळ सुरू होती. तिची ती धावपळ बघून ते शांतच राहिले. राणीने मीतूचा युनिफॉर्म प्रेस केला. तिची स्कुल बॅग रेडी केली. आणि तिला स्कुल साठी तयार करायला लागली. त्यात तिचा टिफिन भरायचा राहिला. तशी ती मितूला म्हणाली . मीतू बेटा तू सावकाश स्कुल मध्ये जा. मी तुझा टिफिन नितु जवळ देते. स्कुल मध्ये तो आणून देईल तुला. जा आता लवकर जा स्कुल मध्ये , तुला वेळ व्हायला नको. पण अगोदरच चिडचिड करणारी मीतू अजूनच चिडली. काही नको मला टिफिन आज मी उपाशीच राहणार. तू टिफिन नितु जवळ पाठवूच नको. तुला बरंच आहे ना मी नाही जेवली तर. राणी नितुच्या बोलण्याने खूप नर्व्हस झाली. तिच्या डोळ्यात आसवे आली . तिने ते हळूच आपल्या पदराने पुसले आणि ती आपल्या कामाला लागली. तिला आता नाईकांची तयारी करायची होती. ती त्या तयारीला लागली. नाईक ऑफिसला निघून गेले मागोमाग नितुही स्कुलला जाय साठी तयार झाला. तिने मीतूचा टिफिन नितु कडे दिला पण नीतूही मीतूचा टिफिन घेऊन जायला तयार नव्हता. तो म्हणाला , आई तू तिला टिफिन नाही दिला ना, मग मी कशाला नेऊ. आता तूच तिला नेऊन दे. मी टिफिन नेणार नाही. राणीने नितुला समजवायचा खूप प्रयत्न केला पण नितु ऐकायलाच तयार नव्हता. आणि तो तसाच स्कुल ला निघून गेला. राणीला मात्र आता रडणे आवरले नाही. तिच्या डोळ्यातून सर सर आसवे गळत होती.
सगळी कामं तिने भराभर आटोपून घेतली आणि मग मीतूचा टिफिन घेऊन ती स्कुल ला जायला निघाली. वाटेतच तिला सरिता भेटली. सरिता नाईकांची बहीण. ती काही काम निमित्त बाहेर निघाली होती. राणी ला बघून तीच थांबली. तिनेच राणीला आवाज दिला. राणीचे सरीताकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात घाई घाईने स्कुल कडे निघाली होती. सारिताचा आवाज ऐकून राणी थांबली आणि सारिताच्या जवळ पोचली. सारिताने तिला विचारले, काय ग राणी इतक्या घाई घाई ने कुठे निघालीस. घरी सगळे ठीक आहेत ना. कुणाला बरं नाही का. आणि कुठल्या विचारात आहेस तू. राणी फक्त सरिता कडे बघतच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना . तशी सरिता म्हणाली अगं तुलाच विचारतेय. काय झालं , तुला बरं नाही का. तू ठीक आहेस ना. तसे राणीच्या डोळ्यातून आसवं टपटप गळायला लागली. सरिता राणीच्या डोळ्यात आसवं बघून अजूनच घाबरली. अगं काय झालं सांग ना. तशी राणी बोलली ताई अहो आज मीतू टिफिन न घेताच स्कुलला गेली. माझंच वेळेवर झालं नाही चूक झाली माझी. तिला मी टिफिन पोचवून येते. त्यासाठी निघाली होती. तशी सरिता बोलली, ते ठीक आहे ग पण तू रडत का आहेस. दादा काही बोलला का तुला. तू टेन्शन नको घेऊस, मी सांगते दादाला . तो असाच आहे. काही न समजून घेताच काहीही अर्थ लावून घेतो. मी समजवते दादाला. चल मी येऊ का तुझ्या सोबत. मला काही जास्त काम नाही. लवकर होईल माझे काम वेळाने गेले तरी चालेल. चल मी येते तुझ्या सोबत. म्हणून सारिताही तिच्या सोबत स्कुल कडे निघाली.
दोघीही स्कुल मध्ये पोचल्या. त्या नितुच्या क्लास मध्ये पोचल्या. क्लास सुरू होता. राणीने टिचरला मीतूचा टिफिन आणल्याचे सांगितले. तसे टीचारनी मितूला बोलवून तिला तिचा टिफिन घेण्यास सांगितले. मीतू जवळ येताच राणीने मितूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या हातात टिफिन देत म्हणाली मीतू बेटा , जेवण करून घेशील. छान हं माझं बाळ . जा बस आता क्लास मध्ये. मी निघते. सारितानेही मीतूची पप्पी घेतली . मीतू क्लास मध्ये जाताच दोघीही परत निघाल्या . वाटेतच सारिताने आपले काम आटोपले. राणीने सरीताला घरी चलण्याचा आग्रह केला. मग दोघीही नाईकांच्या घरी आल्या. राणीने सरिता साठी चहा ठेवला. दोघीनीही आपला चहा संपवला. सारिताच्या मनात अजूनही प्रश्न कायम होता. राणी का रडत होती. सारिताने राणीला परत विचारले काय गं मघाशी तू रडत का होतीस. मला काही सांगशील का. तसे राणी परत रडायला लागली. तिने आपल्या मनात होणारी ओढाताण सरिता जवळ व्यक्त केली. मुलांची तिच्यावर होणारी चिडचिड , घरच्या कामात तिची होणारी ओढाताण सांगितली. सारिताने राणीला समजावले. अगं घरात हे चालतच असते. सगळं मॅनेज करावे लागते. हळूहळू जमेल तुला. आता मुलं मोठी होत आहेत. कळेल त्यानाही तू त्यांच्यासाठी किती धावपळ सहन करतेस ते. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे हा नियमच आहे. तसही तू छान सांभाळलं आहेस सगळं. मुलांना आनंद कशात होतो ते शोधायचं. त्यांना आनंदी ठेवायचं. ते खुश असलेत की सगळे खुश असतील. तू टेन्शन नाही घ्यायचं. राणीला काही संसारतल्या टिप्स देऊन सरिता निघून गेली.
राणीने दुपारचे आपले सगळे काम आटोपले. आज स्कुल मधून मुलांना खुश करायचेच त्यांना आनंदी करायचे असे तिने ठरवले. त्यासाठी काय करावे. राणीला काहीच सुचत नव्हते. तेव्हा राणीला आठवले की नितु मीतू बरेच दिवसापासून राणीला गुलाब जाम करायला सांगत होते. त्यांना गुलाब जाम खूप आवडायचे. तीने पक्के केले आज गुलाबजाम करायचे. राणी ताबडतोब उठून तयार झाली आणि गुलाबजाम साठी खवा घेऊन आली मुलं घरी यायच्या आधीच तिने गुलाबजाम करून ठेवले. सायंकाळी मुलं येताच ती फ्रेश होऊन आपल्या रूम मध्ये गेली. राणीने मुलांसाठी डिश मध्ये गुलाब जाम काढले आणि ती मुलांना बोलवायला त्यांच्या रुम मध्ये गेली. नितु मीतू चला डायनिंग टेबल वर चला आज मी न तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. चला चला. चला पटकन आणि बघा काय आहे ते. मुलं डायनिंग टेबलवर आली. गुलाब जाम बघून तर दोघेही नाचायलाच लागली. तेवढ्यात नाईकही घरी आले. राणीने त्यांच्यासाठी पण डिश तयार केली. नाईक मुलांना खुश बघून स्वतःही खुश झाले होते. सगळ्यांनाच गुलाब जाम खूप आवडले होते. Sanjay R.
नाईक आता आजरातून बरे झाले होते. ते आपल्या नेहमीच्या कामात लागले होते. रोज ऑफिसला जाणे घरातील, बाहेरील साऱ्या जवाबदाऱ्या पार पाडणे यात मग्न झाले होते. सगळेच व्यवस्थित सुरू होते. राणी वरही आता त्यांचे प्रेम जडले होते. राणीही त्यांच्यावर खूप प्रेम करायला लागली होती. नाईक घरात असे तोवर ती सारखी त्यांच्या मागे पुढे राहून नाईकांना खुश ठेवण्या साठी जेही करावे लागायचे ते सगळं अगदी आनंदाने खुशीने करायची. तिला तर आता नाईक ऑफिसला गेल्या नंतर सगळी कामं आटोपून नाईकांच्या आठवणी काढण्यात आनंद वाटायला लागला होता. नाईकांची परतीची वेळ झाली की ती अस्वस्थ व्हायची. सारखी नाईकांची वाट बघायची. नाईक घरी पोचे तोवर तिच्या कितीतरी चकरा अंगणात व्हायच्या. नाईक दारात दिसताच ती आनंदी व्हायची. ते येताच ती त्यांच्यासाठी चहा घेऊन जायची. चहा पिणे होईतोवर त्यांच्याकडेच बघत बसायची. सतत काही ना काही तरी बोलत रहायची. नाईकही तिच्या वर खूप खुश होते. त्यानाही राणीचा सहवास खूप आवडायचा. तेही दिवसभराच्या त्यांच्या ऑफिसमधील गोष्टी तिच्या सोबत शेअर करायचे. रात्री जेवण आटोपल्यावर मुलं झोपी गेल्यानंतर ती नाईकांच्या रुम मध्ये जाऊन नाईकांशी गप्पा गोष्टी करत नाईकांचे हात पाय, डोके दाबून द्यायची. विविध विषयांवर त्यांची चर्चा चालायची. राणी आता सम्पूर्णतः नाईकांची अर्धांगिनी झाली होती. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. राणी नाईकांच्या कुशीतच मग झोपून जायची.
असेच दिवस जात होते. दोघांमधले प्रेम दिवसागणिक अजूनच फुलत फळत होते. मुलंही आता मोठी होत होती. मात्र दोघांच्या या जवळीकीमुळे मुलांना आपली आई आपल्या पासून दूर जात आहे असे वाटायचे. कारण नाईक ऑफिसमधून घरी आल्यानंतर राणीचा जास्त वेळ नाईकांसोबत जायचा. तशात मग मुलं थोडी चीड चीड करायचे.सारखं तिला बोलवून बोलवून काही न काही सांगून आपल्या जवळ गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. पण तेव्हाच मग नाईकही तिला आवाज देऊन स्वतःकडे बोलवून घ्यायचे. तिला इकडे बघू की तिकडे बघू असे होऊन जायचे. ती मुलांचं मन जपायचा खूप प्रयत्न करायची. पण तिला नाईकांना टाळणेही जमत नसे. अशात तीच स्वतःची ओढाताण करून घेत होती. नाईक घरी नसतानाचा सम्पूर्ण वेळ ती मुलांना द्यायची पण नाईक घरी असले की पूर्ण वेळ मुलांना देणे तिला कठीण व्हायचे.
असेच एक दिवस नितुला त्याचे शाळेतून होमवर्क मिळाले पण त्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य आणायचे कामाच्या गराड्यात राहून गेले होते. आज तिने घरातले जास्तीचे काम काढले होते. ते करता करताच सगळा वेळ निघून गेला होता. बाजरात जाणे तिला शक्यच झाले नाही. त्यामुळे नितु सारखा चीड चीड करत होता. नाईकांची ऑफिस मधून यायची वेळ झाली होती. पण नितुची चीड चीड बघून राणीने सगळ्या लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट करून ती बाजारात गेली. सगळ्या वस्तू तिने खरेदी केल्या आणि घरी परत निघाली. पण येता येता तिला बराच वेळ लागला. नाईक ऑफिसमधून घरी पोचले होते. पण आज रोजप्रमाणे त्यांना राणी घरात दिसली नाही. आज चहा ही मिळाला नाही. ऑफिसमध्येही कामात काही चुका झाल्यामुळे साहेबांशी त्यांचा खटका उडाला होता. त्यामुळे त्यांचे मन अशांत होते. घरात राणीला न पाहून ते जास्तच अशांत झाले.
राणीलाही परत यायला बराच वेळ लागत होता तशी त्यांचीही चीड चीड व्हायला लागली. बाजारातून घरी येताच नितु राणी वर जणू ओरडलाच, आई तू आता हे सामान आणून दिलंस आता मी होमवर्क केव्हा करणार. रात्रभर मला आता करत बसावे लागेल. तशी राणी म्हणाली, रागावू नको राजा, होईल सगळं अगदी व्यवस्थित, तू काळजी करू नकोस. मी करते ना तुला मदत. चल आपण दोघे मिळून करू या. पण नितुचा राग मात्र शांत होईना. तशातच ती नितु सोबत त्याला मदत करत राहिली. वेळ फार झाला होता. स्वयंपक ही अजून व्हायचा होता. आज नाईकांकडे बघायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. नाईकांना चहा पण देता आला नव्हता. नाईकही चीड चीड करत होते . सारखा तिला आवाज देऊन तिला बोलवत होते. सगळं केल्या शिवाय तिला जाणे जमलेच नाही. आता दहा वाजायला आले होते. तिने स्वयंपाक आटोपून ताट केले आणि मुलांना व नाईकांना जेवायला बोलवले, तर मीतू झोपी गेली होती. राणीने तिला जागे करून जेवणाच्या टेबलवर बसवले. त्यामुळे तीही चिडत होती. राणी सगळ्यांची चीड चीड बघून आणखीच थकून गेली होती. तिला सगळ्यांना कसे खुश करावे काहीच कळत नव्हते.
जेवण आटोपून सगळे आपापल्या रुम मध्ये गेले. राणीने ताट उचलून सिंक मध्ये नेऊन ठेवले सगळं साफ सुफ करून ती नितु च्या रुम मध्ये गेली. त्याचे होमवर्क आटोपले होते. आणि तो झोपायच्या तयारीत होता. राणीला बघून तो ओरडलाच बघ तुझ्या मूळे मला किती लेट झालं. माझं होमवर्क नसत झालं तर टीचरनी मला पनिश केले असते. राणीने त्याला थोपटण्याचा प्रयत्न केला पण नितुने तिचा हात ढकलून दिला. आणि म्हणाला जा तू आता मीच झोपतो. राणीने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण सारेच निश्फळ झाले. तिला खूप वाईट वाटत होते. पण काहीच इलाज नव्हता. तशी ती मीतू कडे वळली तर तीही झोपी गेली होती. लाईट बंद करून दुःखी मनाने ती नाईकांच्या रुम मध्ये आली. तर नाईकही झोपी गेले होते. सगळेच आज तिच्यावर नाराज होते. सगळ्यांना खुश करण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला पण आजच्या घटनेला तिचा नाईलाज होता. तीही या सगळया मुळे थकून गेली होती. ती तशीच मग लाईट बंद करून नाईकांच्या शेजारी झोपी गेली. आज कितीतरी दिवसानंतर नाईकांनी तिला आपल्या कुशीत जवळ घेतले नव्हते. Sanjay R.
आज नाईकांना यायला थोडा उशीरच झाला. सोबत ते भाजी किराणा घेऊन आले होते. राणी दारात बसून नाईकांचीच वाट बघत होती. नाईकांना बघून ती पुढे झाली नाईकांनी तिच्या हातात भाजी ची पिशवी दिली आणि त्यांनी किराण्याची पिशवी स्वतः घेऊन ते घरात आले. राणीने भाजी किराणा व्यवस्थित भरून ठेवला. आज नाईक थोडे उत्साहात दिसत होते. राणीची आणि त्यांची नजरानजर झाली. नि राणीला कळले की नाईकांना काहीतरी सांगायचे आहे. अजूनही त्या दोघांमध्ये फारसा संवाद होत नव्हता. नाईक राणी पासून थोडे दूर दूरच राहायचे. राणीनेही कधी नाईकांच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता . मात्र ती मुलांमध्ये खूप मिक्स झाली होती. मुले नसली की तिला करमत नसे. तिला एकटे एकटे वाटायचे. मात्र मुलं घरात असली की ती खूप आनंदी असायची. मुलं सारखी आई हे दे , आई ते दे असे काही तरी चालू असायचे. त्यात राणी नेहमीच व्यस्त असायची. तिला त्यात खूप आनंद मिळायचा. मुलं अभ्यासात असली की राणीही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसायची. मुलांचेच पुस्तक घेऊन वाचत बसायची. मग कधी मुलांना अडचण आली की त्यांना ते समजावून सांगायची. हळू हळू राणीचेही ज्ञान वाढत होते. एकदा नजीकच तिला म्हणाले तुला पण शिकायची इच्छा असेल तर आपण तुझी ऍडमिशन मुक्त विद्यापीठाला करू शकू. पण तुला अगोदर दहावी आणि बारावीची परीक्षा द्यावी लागेल. तुला इच्छा असेल तर तसे सांग. राणीनेही ठरवले होते की परीक्षा द्यायची आणि जितके शिकता येईल तितके शिकायचे. नाईक या वेळी तिचा दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरणार होते. आणि सगळी पुस्तके पण राणीला आणून देनार होते. पण तिने ठरवले होते की आपल्यामुळे मुलांचे नुकसान मात्र होऊ द्यायचे नाही. तिने तशी तयारीही सुरू केली होती. आता फक्त पुस्तकांची ती वाट बघत होती. आज नाईकांना काय सांगायचे असेल याचा राणी विचारच करत होती. तसे नाईक बोलले. यावेळी मला लागून तीन दिवस सुट्ट्या येत आहेत. मला वाटते आपण कुठे तरी पिकनिकला जावे. मुलांना पण थोडा चेंज होईल . आणि त्यांना आनंद वाटेल. मी करतो प्लान पक्का. तू बाकी काय काय लागेल त्याची तयारी कर. तसे जास्त काही लागणार नाही. जेवण राहणे आपण हॉटेललाच ठरवू. फक्त मध्ये मुलांना फराळ नास्ता आणि कपडे प्याकिंग एवढंच करावं लागेल. शुक्रवारी सकाळी आपण घरून निघायचे रविवारी सायंकाळ पर्यंत परत वापस यायचे. म्हणजे जास्त त्रासही होणार नाही. जवळचाच एखादा स्पॉट मी शोधतो. राणीलाही नाईकांचा पिकनिक चा बेत खूप आवडला. तिने ते मुलांना सांगितले. मुले तर खुपच खुश झाली. आजचा मंगळवार होता. म्हणजे दोन दिवस बाकी होते. तीही आनंदात तयारीला लागली. तिने थोडे फराळाचे तयार केले . मुलांचे नाईकांचे आणि स्वतःचे कपडे , नाईट ड्रेस काढून प्याक केले. टॉवेल, सॉक्स, चपला, टूथ ब्रश, पेस्ट, तेल, कंगवा, आरसा, थोडी औषधं, सगळं बाजूला काढलं. ब्यागा भरून तयार झाल्या. पाण्याची वॉटर ब्याग आणि इतर सगळे समान आठवून आठवून काढले. शेवटी शुक्रवार ची पहाट उजाडली. सगळे पहाटेच अंघोळी करून तयार झाले. गाडीही दारापुढे हजर झाली. नाईकांनी चिखलदरा मेळघाट चा बेत आखला होता. हॉटेलचे बुकिंग पण झाले होते. नागपूर पासून चखलदरा फार लांब नव्हते. पाच ते सहा तासात ते पोचणार होते. देवाची पूजा करून सगळे गाडीत बसले. आणि गाडी सुरू झाली. मुलं खूपच आनंदात होती. त्यांची सारखी टकळी सुरू होती. नितु म्हणत होता पप्पा आपल्याला तिकडे वाघ बघायला मिळेल का हो. तिकडे खूप दाट जंगल आहे ना. किती मजा येईल. तशी मीतू म्हणाली नाही पप्पा आपण जास्त आत जायचे नाही. वाघांनी आपल्याला पकडले तर. आपण गाडीच्या बाहेरच नाही निघायचे. गाडीतूनच सगळं बघू या. तसा नितु बोलला येहे घाबरट बाई , इतकं काय भ्यायचं. मी आहे ना सोबत. मी पकडलील वाघाला. आणि देईल हाकलून. मला बघून तो आपल्या जवळच येणार नाही. अशीच मुलांची सारखी बडबड सुरू होती. तशातच अमरावती आले. रस्त्यात एक धाबा बघून नाईकांनी गाडी थांबवली. त्यांनी राणी आणि स्वतः साठी चहा मागवला. राणीने मुलांना सोबत आणलेला नास्ता आणि फ्रुट दिले. सगळे खाणे पिणे करून परत गाडीत बसले. आणि गाडी पुढे निघाली. मध्ये जंगल, टेकड्या, छोटे छोटे गाव लागले. मुलांना खूप आनंद होत होता. मग मुलांनी गाडीतच अंताक्षरी सुरू केली. नितु आणि नाईक एका बाजूला आणि मीतू आणि राणी दुसऱ्या बाजूला झाले. नाईकांना खुप जुणे गाणे पाठ होते. तर राणी लाही काही गाणे येत होते. नाईकांचा आवाज जसा चांगला होता तसाच राणीचाही आवाज गोड होता. हसत खेळत गाडी पुढे जात होती. आता घाट सुरू झाला होता. तशी मुलं घाट दऱ्या आणि जंगल बघण्यात दंग झाली. मध्ये काही प्राणी पण दिसत होते. अशातच गाडी चिखलदऱ्याला पोचली. हॉटेल जवळच होते. तेही खूप मस्त लोकेशन ला होते. ते टेकडीच्या मध्ये असल्यासारखे वाटत होते. आजूबाजूला दाट जंगल होते. दुपार असूनही खूप थंड वाटत होते. सगळे गाडीतून उतरले. नाईक हॉटेलमध्ये आत जाऊन रूम बुक असल्याची खात्री करून आले. मग सामान काढून रुम मध्ये गेले. रूम पण खूप छान सजवलेली होती . बाथ पण खूप स्वच्छ आणि सुंदर सजवलेला होता. नाईक रूम बघून खूप खुश झाले. रुम मधेच छोटासा फ्रीज होता. त्यात कोल्ड ड्रिंक आणि फ्रुटस, काही ड्राय फ्रुटस, चॉकलेट्स ठेवलेले होते. मुलं तर ते बघून खूपच खुश झाले. रूमच्या मागच्या बाजूने टेरेस होता. टेरेसमध्ये टेबल चेअर्स लावलेले होते. टेरेस मधून सुंदर टेकडी, पलीकडे झुळझुळ वाहणारी नदी आणि मोठमोठी झाडे दिसत होती. ते दृश्य फारच मनमोहक होते. रुम बघून सगळेच खूप खुश झाले होते. थोड्याच वेळात दरावर गॉड रिंग वाजली. दार उघडून बघितले तर दारात आकर्षक पोशाखात वेटर सर्व्हर ट्रॉली घेऊन उभा होता. त्याने नाईकांना चहा, कॉफी विचारली. नाईकांनी कॉफी सांगितली . वेटरने राणी आणि नाईकना कॉफी दिली. मुलांना दूध आणि बिस्कीट दिले. आणि जेवण केव्हा घ्याल विचारून गेला. कॉफी दूध घेऊन सगळे फ्रेश झाले. थोड्याच वेळात जेवण आले. टेरेस मध्ये टेबलवर सगळे जेवायला बसले. जेवण ही खूप टेस्टी होते. सगळे जेवण करून आरामात कॉट वर थोडे लोटले. सायंकाळी सनसेट पॉईंट बघायला जायचे होते. मुले ते सगळं बघून खूपच खुश झाले होते. सायंकाळी तयार होऊन सगळे सनसेट बघायला गेलं. ते दृश्य तर अप्रतिम सुंदर होते. नाईकांनी तिथे बरेच फोटोज आणि सेल्फी काढल्या. राणी नाईक आणि मूल यांचे ग्रुप फोटो दुसर्याकडून काढून घेतले. सगळेच खूप खुश होते. आता अंधार पडू लागला होता. सगळे परत हॉटेल ला जायला परत निघाले. मग थोडा मार्केट चा फेरफटका मारून सगळे हॉटेल ला परत आले. तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. वेटर परत रात्रीचे जेवण घेऊन आला. सगळ्यांनी मस्त हसत खेळत गप्पा करत जेवण संपवले. उद्याचा प्लान पूर्ण पणे रेडी होता. तिथले प्रसिद्ध पॉईंट्स बघून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला जंगलात आत जायचे होते. दुपारचे जेवण तिकडेच जंगलात ठरलेले होते. मुले वाघाची स्वप्ने बघत झोपी गेली. सकाळी पहाटेच उठून सगळे तयार झाले आणि पॉईंट्स बघायला निघाले. भीमकुंड, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट तिथला धबधबा, मोझरी पॉईंट हरिकेत पॉईंट बघून आणि रुचकर स्वादिष्ट जेवनाचा आस्वाद घेऊन ते मग ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला रवाना झाले. मेळघाट पट्टेदार वाघांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक जंगली जनावरे पाहायला मिळतात त्यात हरीण अस्वल, कोल्हा, लांडगा, नीलगाय, हरीण, सांबर, ससे, मोर, माकड व खूप सारे पक्षी बघायला मिळतात. आज नाईक परिवाराचे भाग्य खूपच जोरात होते. आतमध्ये प्रवेश करताच दोन किलोमीटर पुढे जात नाही तो त्यांची गाडी थांबली. समोरून रस्ता क्रॉस करून एक पट्टेदार वाघ जात होता. सगळ्यांच्या मनात एकदम धस्स झाले. राणीने एका हाताने मुलांना धरले आणि दुसऱ्या हाताने नाईकांना धरले. तिचे भानच हरपले होते. ड्रायव्हर ने सगळ्यांना शांत पणे बसून राहायचे सांगितले. नाईकांनी ताबडतोब मोबाईल काढून वाघाचे फोटो घेतले. मुलं तर एकदम स्तंभित होऊन वाघाकडे बघतच राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रोडवरून वाघ बाजूला जंगलात अदृश्य झाला. त्यानंतर गाडी पुढे निघाली. पुढे हरीण, माकड , नीलगाय, ससे, मोर ही बघायला मिळाले. सगळेच खूप खुश झाले होते. वाघाचे दर्शन घेऊन नाईकांची पिकनिक आनंदमय झाली होती. रात्र होता होता नाईक परिवार परत हॉटेल ला पोचला. आता मात्र मुलांना जोश आला होता. वाघ कसा चालत होता. तो कसा बघत होता. त्याचा रंग कसा होता त्याचे पट्टे किती सुंदर दिसत होते. यावर चर्चा करत होते. राणी ही खूप खुश झाली होती. आज ती नाईकांना टेकून बसली होती. मध्ये मध्ये गाडी हल्ल्यामुळे दोघांचाही एकमेकास स्पर्श होत होता. राणी त्या स्पर्शात खूप सुखावत होती. नाईकांनाही राणीचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. आज पहिल्यांदाच दोघेही तो स्पर्श अनुभवत होते. रात्रीचे जेवण करून सगळे आरामात झोपी गेले. सकाळी परत निघायचे होते. रस्त्यातच ते मुक्तगिरी आणि बहिरम चे दर्शन करायला जाणार होते. अमरावतीला देवीचे दर्शन ही घ्यायचे होते. आणि नंतर नागपूरला परतायचे होते. आज तिसरा पिकनिक चा तिसरा परतीचा दिवस होता. सगळे सकाळी उठून तयार झाले. नास्ता करून परतीचा प्रवास सुरु झाला. मुक्तगिरी जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. संगमवरी दगडांनी बांधलेले मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिथे जायला पायऱ्या चढाव्या लागतात. पण कुणालाही थकवा जाणवला नाही. मुलं तर अगदी जोशात होती. दर्शन करून त्यांनी तिथेच जेवण घेतले. जेवण अगदी साधे होते पण खूपच स्वादिष्ट होते. तिथून ते बहिरम ला गेले तिथे ही टेकडी चढून मंदिरात जावे लागते. दर्शन करून सगळे आता अमरावतीला निघाले. अमरावतीला अंबा देवीचे दर्शन करून थोडा वेळ मंदिरातच आराम करून गाडी आता नागपूर कडे निघाली. पिकनिक खूपच छान झाली होती. घरी पोचता पोचता रात्र झाली होती. आता मात्र सगळे थकले होते. थोडे जेवण करून सगळे पिकनिक ची चर्चा करत झिपी गेले. Sanjay R.