चला….
जाऊ देवा घरी….
आहे तिथे हरी….
असेल भले सारे
वाटते इथल्या परी….
मंदिरात कुठे देव
ते नदीच्या तीरी….
भजन तिथे करून….
भोजन आपल्या घरी…
भुकेले हे पोट…
त्यास कष्टाची चाकरी…
रात्रन दिवस खपून
नाही पोट हे भरी…..
उपवास नको आता…
पोटात लागल्या सरी…..
रिकाम्या पोटाला हो
हवी ऐक भाकरी……
वाहतो संसाराची धुरा….
रोज होते एक वारी….
स्वप्न पाहता पाहता
दिवस जातो भारी….
गरीबाची ही कहाणी
वाटते कुणा खरी…
भोग भोगतो सारे
नाही वाटत बरी….
चला….
जाऊ देवा घरी….
आहे तिथे हरी….
असेल भले सारे
वाटते इथल्या परी….
Sanjay R.

खुप छान कविता
https://www.bruhaspatinath.com/purush-suktam-sanskrit/
LikeLiked by 1 person
धन्यवाद 🙏
LikeLike