अमावसेची काळी कुट्ट रात्र
डोळ्यात बोट घातले तरी काहीच दिसणार नाही…..
दूर कुठे तरी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतोय…
मधेच रातकिड्यांचा ची ची आवज उठत होता……
त्यातच पंखांचा फडफडाट झाला…….
झुडपामधून एक पक्षी उडून दूर निघून गेला…..
तिकडे बघितले तर दोन डोळे झुडपामधून चमचमत होते……..
मी घाबरलोच. काय करावे काहीच कळेना……
पळायचे म्हटलं तरी रास्तच कुठे दिसत नव्हता…….
तोंडातून शब्दही फुटत नव्हते………
अंग लटलट कापायला लागले होते……..
डोक्यापासून सम्पूर्ण शरीर घामाने ओले झाले होते……….
घाम ठिबकत होता…….
तशातच माझा होश गेला…….
मला कळत होतं की मी आता पडणार पण काहीच करता येत नव्हते…….
मला जेव्हा जाग आली तेव्हा मी तसाच खाली पडलेल्या अवस्थेत होतो………
मी केव्हा पडलो, किती वेळ पडून राहिलो, काहीच अंदाज येत नव्हता………
नंतर मला आठवले ते दोन डोळे……..
मी उठून बसलो……..
त्या दोन डोळ्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला…….
पण आता ते कुठेच दिसत नव्हते……
मी उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला पण मला उभेच राहता येत नव्हते……..
पायातून कळा निघत होत्या……..
मी तसाच किती तरी वेळ बसून राहिलो…….
हळूच उजेड व्हायला लागला…….
तसे मला आता दिसायला लागले होते…..
मी पडलो तिथे थोडी मोकळीक जागा होती……
पण मी नेमका एक मोठ्या दगडावर कोसळलो होतो. त्यामुळे पायाला मुका मार लागला होता……..
बाजूलाच ती झाडी दिसत होती…….
मी तिकडे बघितले तर तिथे एक मोठा अजगर मरून पडलेला होता…….
कदाचित रात्री दिसलेल्या त्या दोन डोळ्यांच्या जनावरनेच त्याची शिकार केली होती…….
आणि अजगराला मध्ये मध्ये त्या जनावरने खाल्ले असावे असे दिसत होते……..
माझा मात्र जीव वाचला होता…….
नंतर काही वेळाने त्याच मार्गाने दोन व्यक्ती आले……..
त्यानी मला पडलेला बघून मदत केली……
आणि डॉक्टर कडे नेले…….
डॉक्टर ने स्प्रे वगैरे मारून उपचार केला आणि मला चालते केले……
त्या रात्री माझा जीव वाचला होता……..
अजूनही मला ती रात्र आठवली की भीतीने माझा थरकाप होतो………..
