आमच्या गावात होता एक अप्पू चारी……
ठेंगणा ठुसका होता तो भारी………
भेदरे नाक, तिरके डोळे……
कपाळ मोठे, दिसायचा कसातरी……..
रंग होता काळा……….
रागावला की मग पडायचा निळा…….
नटवरलाल म्हणताच धावायचा मागे……..
शिव्या देत देत मग पठीमागेच लागे……….
असा मात्र तो छानच वागे………
वाटायचा सरळ पण होता तिरका…….
बोलता बोलता आवज काढायचा चिरका…….
म्हणताच कोणी, आली गावात सर्कस…..
खुश तो व्हायचा…….
स्वतःच स्वतःला हिरो म्हणायचा…..
बघून सर्कस खूप हसायचा……
बनून मग जोकर गावभर फिरायचा ……
गावात एकदा अशीच आली सर्कस….
विदूषक म्हणून अप्पू झाला भरती……
प्रत्येक शो मध्ये अप्पूच दिसायचा…….
पोट धरून धरून लोकांना हसवायचा……
झुल्याच्या शो मध्ये खाली पडायचा….
वाघाच्या समोर नुसताच पळायचा…….
ढिला ढाला पॅन्ट हाताने धरायचा….
खाली जाताच वर करायचा……
रागावलं कोणी तर खूप रडायचा….
लोकांना बघून खूप हसायचा……
अप्पू शिवाय मग शो नाही व्हायचा……
अप्पू अप्पू म्हणून आवाज तोच द्यायचा…..
लोकांना बघून टाळ्या वाजवायचा……
मीच आहे हिरो सगळयांना सांगायचा…..
लहान थोरांना ही अप्पूच आवडायचा…..
संपली मग सर्कस हिरमुसला अप्पू …..
म्हणतो स्वतःला मीच का असा ढप्पू ……
एकदा बघा गममतच झाली……
त्याच्याच उंचीची मुलगी मिळाली……
प्रेमात पडला अप्पू……
नाव तिचे टिककु……
अप्पू गेला विचारायला करशील का लग्न…..
ती म्हणे आवडला नाही तू मला…..
बघून मी ठरविल तुझं कसं वागणं…..
अप्पू ने मिळवला तिच्या घराचा पत्ता….
टिककु टिककु करत मारायचा फेऱ्या…
टिककुही मग दाखवायची तोरा….
कमी पडायचा अप्पूच दोरा…..
कंटाळून शेवटी टिककु झाली तयार….
अप्पू टिककुच्या लग्नात आली बहार……
अप्पू टिककु ची जोडी जमली…..
दोघेही मग एकमेकात रमली……
दोघेही आता दुकानात बसतात….
जुन्या आठवणी काढून खूप हसतात….
संजय रोंघे
नागपूर
मोबाईल – 8380074730
