नको उसवूस वीण नात्याची
वाढेल घरघर जशी जात्याची ।
असेल आठवण एकेक क्षणाची
अवस्था असेल कशी मनाची ।
कुठे पडेल उनीव तुज कोणाची
असेल सावली सदाच प्रेमाची ।
आईच तर देते पाखर मायेची
होशील तुही आई कधी मुलाची ।
लोटू नकोस दूर आहे आस घराची
अनमोल ही नाती आहेत जीवाची ।
Sanjay R.
