दिवाळी – राणी भाग दहा

       नितु आता आपले उच्च  शिक्षण आटोपून अमेरिकेला एक मोठ्या कँपनी मध्ये जॉईन झाला होता. मीतू पण आपले शिक्षण सम्पवून लग्न करून ऑस्ट्रेलियाला सेट झाली होती. नाईक ही रिटायर्ड झाले होते. त्याना पेन्शन बरीच मिळत होती. राणी आणि नाईकांचे दिवस ही कधी अमेरिका कधी ऑस्ट्रेलिया तर कधी भारतात निघत होते.  मुलांचे सुख बघून राणी आणि नाईक निश्चिन्त झाले होते.  त्यांचेही म्हातारपणाचे दिवस आता आनंदात निघत होते. दोघांनाही एकमेकांचा आधार होता.  मधे मधे नाईकांची बहीण सारीता ही येऊन जायची. तिला वाटलं तर चार दिवस ती पण नाईकांकडे राहून जायची. तिचे मिस्टर गेल्या पासून ती एकटीच झाली होती. तिचा मोठा मुलगा तिथल्याच कॉलेज ला प्रोफेसर झाला होता. तोही आपल्या संसारात खुश होता. नाईकांना अडीअडचणीच्या वेळी मदत करायचा .नाईकांना त्याचा खूप आधार होता. ताईचा छोटा मुलगा मुंबई ला नोकरीला होता. तोही सुट्ट्यांमध्ये येऊन जायचा. येकून सम्पूर्ण कुटुंब व्यवस्थित सेट झालं होते. सगळेच आपल्या संसारात खुश होते.

       नाईकांना आता कशाचीच चिंता उरली नव्हती. पुढल्या आठवड्यात दिवाळी येणार होती. दिवाळी साठी नितु अमेरिकेहून सुट्ट्या घेऊन येणार होता. त्याने मीतूला तसे कळवले होते.  मीतू पण येण्यासाठी प्रयत्न करत होती.  अगदी वेळेवर तिच्या सुट्ट्या मंजूर झाल्या होत्या आणि तिचे येण्याचे तिकीट कन्फर्म झाले होते. दिवाळीला सम्पूर्ण कुटुंब एकत्र येणार होते. राणी खूप खुश होती. तिची दिवाळीच्या तयारी साठी धावपळ सुरू होती.  नितुला काय काय आवडते मितूला काय काय आवडते आता राणीला चांगलेच माहिती होते.दोघांच्याही आवडीचे सारे पदार्थ राणीने करून ठेवले होते.  वारंवार फोन करून नितु मीतूला सारखे विचारत होती आता निघायला किती दिवस उरलेत, कधी निघणार, कधी पोचणार. तिला मुलं कधी येतील आणि कधी मी त्यांना बघेन असे झाले होते.

       दुपारी काम आटोपून राणी नाईकांसीबत गप्पा करत बसली होती. तितक्यात सरिता चा आवाज आला राणी राणी. राणीने उठून दार उघडले. सरिता आत आली. ती नाईकांकडे बघत म्हणाली दादा मी सगळे ठरवले. तुला आता काळजी करायची बिलकुल गरज नाही.  नाईकांना काहीच कळले नाही. ते म्हणाले अगं कशाबद्दल बोलत आहेस. तशी सरिता बोलली अरे ते पाटील आहेत ना त्यांची मुलगी निशा आपल्या नितु साठी परफेक्ट मॅच होईल. मी तिच्या आई बाबांशी बोलून आले. आपला नितु त्यांना पसंत आहे. आता नितु आला की दोघांची भेट करवून देऊ. त्यांचा होकार झाला की . ताबडतोब मुहूर्त काढून बँड वाजवून टाकू. नाईकांच्या अर्ध्या चिंता त्यांची बहीण सारिताच पार पाडत होती. नाईकांनाही ते प्रपोजल खूप आवडले.निशा पाहायला सुंदर होती. पोस्ट ग्रॅज्युएशन आताच पूर्ण झाले होते .  ती नितु साठी अनूरूपच होती. नितु मीतू सोमवरला पोचणार होते. आज रविवार होता. राणीची दिवाळीची सगळी तयारी झाली होती. आता मुलांचीच तेवढी कमी होती. सोमवार उजाडला सकाळी सकाळीच नितु मीतू दोघेही घरी पोचले. नितुने बाहेरूनच राणी ला आवाज दिला आई आई अगं कुठे आहेस, बघ आम्ही आलो आहेत. तशी राणी ने दार उघडले . तिने दोघांनाही जवळ घेतले. मीतू चा नवराही आला होता. तो पण खूप स्मार्ट उंच पुरा हँडसम होता. फक्त तो शांत स्वभावाचा होता. सगळे आत आले. राणीने त्यांना चहा दिला. चहा पिऊन सगळे फ्रेश झाले. फराळ आटोपला. राणीने जेवणाची तयारी केली. तोवर सारिताही आली. दुपारी पाटलांच्या घरी जायचे होते. निशाला बघायला. जेवण करून थोडा आराम झाला. मग सगळे निशाला बघायला पाटलांच्या घरी पोचले. निशाला बघून नितु अगदी खुश झाला. त्याला निशा  आणि निशाला नितु पसंत आले.  सहीच दिवसांनंतरचा मुहूर्त काढून लग्नाचा दिवस पक्का झाला.

        आता दिवाळी आटोपली नितुचे लग्न आटोपले. निशा चा व्हिसा मिळायला तीन महिने लागणार होते. म्हणून नितु एकटाच अमेरिकेला निघून गेला होता. निशा राणी सीबत च राहत होती. दोघी सासू सुना असूनही माय लेकी इतके प्रेम त्यांच्यात जुळले होते. तशातच एक दिवस नितु चा फोन आला. त्याच्या कम्पनीने त्याला भारतातच ट्रान्स्फर दिली होती. तो आपल्या घरीच राहून भारतात कंपनीचे भारतातले त्यांचे ऑफिस त्याला सुरू करायचे होते. आणि सम्पूर्ण भारतात कंपनीचा बिझनेस डेव्हलप करायचा होता. जवाबदारी मोठी होती पण ते चॅलेंज नितु ने स्वीकारले होते. नाईक राणी निशा सरिता आता खूपच खुश होते.
Sanjay R.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.