पस्तिशीले टेकला बाबू
जुडेच न्हाई लगन ।
सारेच होते कंटायले
समजे न्हाई करा का लागन ।
एक दिस गावात आले बुवा
होते मने पुरं, जो जे मागन ।
बाबू धरून बुवाचे पाय म्हने
मायराज होईन कवा लगन ।
लय फिरलो गाव गाव
सांगा काय करा लागन ।
बुवा म्हने बाबुले जाजो पूर्वेले
तिकडं नशीब तुह खुलन ।
फकस्त धा दिस थांब
मंग होईन तुह मिलन ।
हरिक झाला बाबुले
म्हने होते आता लगन ।
चारच दिसात आले पावने
पोरगी पाहून जुयलं लगन ।
म्हने लय पावला मायराज
महा जमलं आता भजन ।
लयच खुश होता बाबू
ज्याले त्याला देये भाषन ।
तारीफ करे मायराजाची
म्हने किरपा त्यायचीच असन ।
Sanjay R.
