वाटे मनास माझ्या
क्षण व्हावा आनंदाचा ।
हास्य गाली असावे
लवलेश नको दुःखाचा ।
द्वेष उरात भरला
लागतो कोण कुणाचा ।
स्वार्थाचा धरून हात
नाही विचार जनाचा ।
जीवन हे अनमोल
नाही वेळ क्षणाचा ।
वाटे मज हवे सारेच
थांग लागेना मनाचा ।
लावा उधळून कुविचार
सद्भाव आहे गुणाचा ।
घेतो मीही जगून
तृप्त भाव या तनाचा ।
Sanjay R.
