कशी गं तू आजी
हसत नेहमी असतेस ।
आजी झाली गं तू
पण म्हातारी कुठे दिसतेस ।
बोलणं तुझं गोड गोड
माया किती करतेस ।
रागावत नाही कधीच
सारखी माझ्याकडेच बघतेस ।
लागता मला थोडही
काळजी किती तू करतेस ।
स्वतःच्या वाट्याच सारं
मलाच गं तू देतेस ।
करमत नाही तुझ्या विना
अंतरात माझ्या वसतेस ।
बंध हा नात्याचा गं
किती गं तू जपतेस ।
Sanjay R.
