” दिवाळीचं गिफ्ट “

सकाळचे आठ वाजलेत तरी आज सुशी झोपून उठली नव्हती. तिची सासू वारंवार तिच्या खोली जवळ जाऊन ती उठली की नाही याचा अंदाज घेत होती. पण तिच्या रुमच दरवाजा बंद बघून माघारी फिरत होती. आज कामाचा सगळाच भार सासू बाईवर येऊन पडला होता. त्यामुळॆ सासूबाचा अगदी तडफडा सुरू होता. पण आता मात्र सासूबाईचा धीर सुटत चालला होता. राग अगदी ओठांवर येऊन स्फोट होण्याची वाट बघत होता. छोटीशी ठिणगीही आता आग लागण्यास पुरे होती. त्यातच बाजूच्या पाटील बाईंनी हाक दिली. काय गं सुशी काय करतेस. सासूबाई बाहेर आल्या.तशा पाटील बाई हातात असलेलं काही तरी लपवण्याचा प्रयत्न करायला लागल्या. सासूबाईला संशय आला.
सासूबाई म्हणाल्या काय हो पाटील बाई काय झालं. आज ना सुशीची अजून सकाळ व्हायचीच आहे. माहीत नाही अजून का उठत नाही ते. मी सकाळ पासून नुसती येरझारा घालतेय. तशा पाटील बाई बोलल्या अहो आवाज द्यायचा ना. बघा बाई तिची तब्येत वगैरे बरी नसेल नाहीतर.
तशी सासूबाईला पण चिंता जाणवायला लागली. सुदीप चार दिवसापासून मुंबई ला गेला होता अजून दोन दिवस तरी तो येणार नव्हता. त्यामुळे घरात दोघीच होत्या. आता मात्र सासूबाईला जीव वर खाली व्हायला लागला. चिंता जास्तच वाढली होती. तशा त्या पाटील बाईला म्हणाल्या,  अहो पाटील बाई याना आत  मी सुशीला उठवतेच बघा. काय झालं ते बघायला हवं. या मग मी चहा ठेवते बसा थोडं .
पाटील बाईंना बसवून सासूबाई परत सुशीच्या रुम कडे गेल्या आणि यावेळी सरळ सुशीला आवाज देत दरवाज्याला धक्का दिला तर दार उघडे झाले. आत सुशी नव्हती. सासूबाईंना आश्चर्यच वाटले सकाळ पडून त्या सुशीची वाट बघत होत्या तिची उठायची आणि सुशी मात्र आत नव्हती. ती आधीच उठलेली होती. मग मात्र त्यांच्या मनात प्रश्न चिन्ह उभे झाले. हे काय सुशी घरात नाही तर गेली कुठे. त्या तशाच बाहेर आल्या. आणि सुशीला शोधू लागल्या. पाटील बाईही सासूबाईंची चिंता समजल्या. मग त्याच बोलल्या आहो माधुरी ताई सुशी तर पहाटेच मला फुलं सांगून गेली होती. मी आता तेच तिच्या करिता फुल घेऊन आली होती. ती कुठे बाहेर गेली का. सासूबाईंना काही कळलेच नाही. सुशी ने आज फुलं का मागवले आणि पहाटे उठून ती गेली कुठे. तेवढ्यात सुशीच दारापुढे हजर झाली. तश्या सासूबाई बोलल्या अग सुशी तू केव्हा उठली कुठे गेली. आणि आता कुठन येत आहेस.
मला काहीच माहिती नाही. मी आपली तू झोपून असणार म्हणून कितीदा तुझ्या दारापुढे आली आणि परत गेली. काय झालं ग….
सुशी आत आली आणि सोप्यावर बसली. अहो सासूबाई काल नाही का मी सायंकाळी डोकटर कडे गेले होतेतर डॉक्टरांनी मला काही टेस्ट करायला दिल्या होत्या आणि त्यातली एक टेस्ट सकाळी काहीही न खाता पिता करायची होती. म्हणून मी पहाटेच उठून तयार झाली नि टेस्ट करून आली. मी तुम्हाला उठवणार होते हो पण तुम्ही शांत पणे झोपलेल्या होत्या. म्हणून मी तुम्हाला न उठवता तशीच जाऊन आले. मला वाटलं हॉस्पिटल जवळच आहे तर मी लवकरच परत येईल पण टेस्ट करायला थोडा जास्तच वेळ लागला हो . मोबाईल पण घाई घाईत घरीच राहिल्यामुळे मला तुम्हाला सांगताच आले नाही.
झाली आता टेस्ट दुपारी रिपोर्ट मिळणार अस बोलले डॉक्टर.  तश्या सासूबाईंची चिंता अजूनच वाढली. अग पण तुला झाले काय, आणि टेस्ट का सांगितल्या डॉक्टरांनी.  तशी सुशी बोलली अहो काही नाही काळ मला थोडं बरं वाटत नव्हतं ना म्हणून डॉक्टरांकडे जाऊन आले. तर त्यांनी काही टेस्ट कराव्या लागतील म्हणून सांगितले. तुम्ही पण रात्री मंदिरातून लेट आल्या ना म्हणून मला सांगताच आले नाही. पण डॉक्टर बोलले की चिंता करण्याचे कारण नाही हे रुटीन चेकअप  आहे. बघू आता सायंकाळी रिपोर्ट आला की कळेल सारे. तशी सासूबाईंची चिंता थोडी कमी झाली आणि त्या चहा करायला किचन कडे गेल्या. पाटील बाईंनी सुशीला सोबत आणलेले फुलं दिले.  आणि म्हणाल्या काय ग सुशी आज काय पूजा वगैरे आहे काय, फुल मागवलेत ते. तशी सुशी म्हणाली अहो काकू म्हटलं आज गजानन महाराजांच्या पोथी चे वाचन करावे म्हणून मी फुल मागितले तुमच्याकडे. मी घाईत असल्यामुळे मला ते तोडता आले नाहीत. बसा तुम्ही मी आलेच दोन मिनिटा असे म्हणून सुशी चेंज करायला आत गेली.
सासूबाई तशा चहा घेऊन आल्या. मग तिघीनीही आरामात बसून चहा घेतला. आणि पाटील बाई आपल्या घराकडे गेल्या. सासूबाईही आपल्या तयारी करायला गेल्या. सुशीची पूजेची तयारी केली आणि पोथी चे वाचन सुरू केले. सासूबाईही तिथे येऊन बसल्या. मधेच सासूबाई बाईला स्वयंपाकाचे सांगून परत येऊन बसल्या. पोथी वाचन झाल्यावर दोघीही सासू सुनेने आरती केली आणि आरामात जेवायला बसल्या. दोघींही जेवण करून थोडी वश्रांती घेतली आणि आपली बाकीची कामे उरकली. सायंकाळी सुशीला डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला जायचे होते. सासूबाईंनी मी पण डॉक्टर कडे सुशी सोबत येणार म्हणून सांगितले.
सायंकाळी सुशी आणि सासूबाई मिळूनच डॉक्टरकडे पोचल्या. दोक्तरांनी बोलावल्यावर दोघीही डॉक्टर च्या कॅबिम मध्ये गेल्या. सासूबाईंच्या कपाळावर चिंतेची लकीर स्पष्ट पणे दिसत होती. दोघीही आत पोचताच  डॉक्टर स्मित हास्य करत सुशीला म्हणाले अभिनंदन. मला जे वाटत होतं ते बरोबर निघालय . तुम्ही लवकरच आई हिणार आहात, आणि वळून सासूबाईकडे बघत म्हणाले तुम्ही आजी होतंय. मस्त पैकी एक पार्टी अरेंज करा. सासूबाईंची ती बातमी ऐकून चिंता पूर्णपणे सम्प्ली होती. त्यांच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची होती. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता.  आज सुशीने त्यांना हे खूप मोठे स्पेशल गिफ्ट दिले होते. दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपली होती. दोघींसाठीही हे दिवाळी गिफ्टच होते. सासू आणि सून खूप आनंदित झाल्या होत्या.
संजय रोंघे
नागपूर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.