आजची सकाळ ना मला
थोडी वेगळीच वाटली ।
निळे आभाळ सूर्याची लाली
सौंदर्याने धरा कशी नटली ।
हिरवी पाने रंगीबेरंगी फुले
धरा ही कशी रंगात भिजली ।
झुळझुळ वारा डुलता पसारा
सृष्टी सारी ही किती सजली ।
जिकडे तिकडे हिरवा गालिचा
दवबिंदूनी झाली धरती ओली ।
प्रसन्न झालो बघून थाट धरेचा
हास्य पसरले क्षणात गाली ।
Sanjay R.

सुंदर सकाळ
On Wed, Oct 28, 2020, 12:53 “माझ्या कविता” : Sanjay Ronghe wrote:
> Sanjay Ronghe posted: ” आजची सकाळ ना मलाथोडी वेगळीच वाटली ।निळे आभाळ > सूर्याची लालीसौंदर्याने धरा कशी नटली । हिरवी पाने रंगीबेरंगी फुलेधरा ही कशी > रंगात भिजली ।झुळझुळ वारा डुलता पसारासृष्टी सारी ही किती सजली । जिकडे तिकडे > हिरवा गालिचादवबिंदूनी झाली धरती ओली ।प्रसन्न झालो बघ” >
LikeLiked by 1 person