दे जरा सन्मान तू
या स्त्री शक्तीला ।
कर विचार थोडा
सांगा त्या व्यक्तीला ।
करू नको अन्याय
विचार तू मनाला ।
कोण ही नारी
विसरलास का आईला ।
हो जागा थोडा
बघ तुझ्या बहिणीला ।
उभी बाजूला तुझ्या
सांग तू पत्नीला ।
झाली मोठी थोडी
बघ तुझ्या मुलीला ।
नाते असो कुठलेही
स्थान हृदयात प्रेमाला ।
प्रत्येक रुपात दिसेल
कर तू नमन देवतेला ।
दुर्गा अंबा जगदंबा
भय तिचे राक्षसाला ।
होऊन निडर लढते
करतो सलाम शौर्याला ।
नारी तूच आहे महान
नाही शंका कोणाला ।
नतमस्तक आम्ही सारे
आधार तुझा जीवनाला ।
Sanjay R.

स्त्री शक्तचे वर्णन कवितेतून खूप सुंदर मांडले आहे
On Thu, Oct 22, 2020, 10:02 “माझ्या कविता” : Sanjay Ronghe wrote:
> Sanjay Ronghe posted: ” दे जरा सन्मान तूया स्त्री शक्तीला ।कर विचार > थोडासांगा त्या व्यक्तीला ।करू नको अन्यायविचार तू मनाला ।कोण ही नारीविसरलास > का आईला ।हो जागा थोडाबघ तुझ्या बहिणीला ।उभी बाजूला तुझ्यासांग तू पत्नीला > ।झाली मोठी थोडीबघ तुझ्या मुलीला ।नाते असो कुठलेहीस्थान हृदयात ” >
LikeLike
धन्यवाद
LikeLike
स्त्री शक्तीचे वर्णन खूप छान पध्दतीने कवितेत मांडले आहे
On Thu, Oct 22, 2020, 10:02 “माझ्या कविता” : Sanjay Ronghe wrote:
> Sanjay Ronghe posted: ” दे जरा सन्मान तूया स्त्री शक्तीला ।कर विचार > थोडासांगा त्या व्यक्तीला ।करू नको अन्यायविचार तू मनाला ।कोण ही नारीविसरलास > का आईला ।हो जागा थोडाबघ तुझ्या बहिणीला ।उभी बाजूला तुझ्यासांग तू पत्नीला > ।झाली मोठी थोडीबघ तुझ्या मुलीला ।नाते असो कुठलेहीस्थान हृदयात ” >
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike