” तुले हसता न्हाई येत “

” वऱ्हाडी हास्य कविता “

आयुष्याचे दिस किती
मोजता न्हाई येत ।

लडून लडून डोये सुजले
पुसता न्हाई येत ।

लडता लडता गया दाटला
बोलता न्हाई येत ।

डोकं झालं गा लयच जड
सांगता न्हाई येत ।

हासाव मानलं थोडसं त
हसता न्हाई येत ।

कहाले जगतं बावा तू
तुले काईच न्हाई येत ।

सोड तू इचार आता
तुले टेन्शन न्हाई देत ।

चाल जाऊ दोस्तायकडं
का चालता बी न्हाई येत ।

दोस्त महा हाये वर्हाडी कवी
थो असा बसू न्हाई देत ।

हासून हासून पोट फुटल
पर हालू न्हाई देत ।

हासाले गा लागते काय
दात बी थो काढू न्हाई देत ।

निस्ता करजो हा हा तू
म्हणन कोन….
तुले हसता न्हाई येत ।

Sanjay R.

2 thoughts on “” तुले हसता न्हाई येत “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.