आठवण आली ना
की व्हायचे भास ।
अंतरातच मग थोडे
थांबायचे श्वास ।
आजही कशी मज
आली तुझी आठवण ।
मन झालं थोडं अधीर
जीव झाला कण कण ।
उचकीने मांडला उच्छाद
कानांनी घेतली साद ।
नजर झाली भिर भिर
वाटले व्हावा थोडा संवाद ।
मनात तुझाच ध्यास
नव्हते काहीच लक्षात ।
स्वप्नच अवतरले जणू
पुढ्यात तूच साक्षात ।
बघितले तुझे लाजनें
गालात थोडे हसणे ।
नेत्रांचा तुझ्या दिवना
रूप तुझे किती देखणे ।
सुखावून गेला तो क्षण
भान माझे हरपले ।
फुल गुलाबाचे जणू
मी हृदयात माझ्या जपले ।
Sanjay R.