आली आली
निवडणूक आली ।
राजनेत्यांची धावपळ
सुरू झाली ।
हुशार किती हे नेते
वाटे मतदार सारे मूर्ख ।
खरे खोटे सारेच ठाव
फेकतात काढून सारा अर्क ।
होळी यांची झाली सुरू
माखून जातील चिखलात सारे ।
इलेक्शन म्हणजे सावळा गोंधळ
भिनले अंगात वारे ।
बेशरमकीची करतील हद्द
जिवंतपणीच घालतील श्राद्ध ।
मान सन्मान तुडवत पायी
बरबटलेले सारेच दाखवतील शुद्ध ।
दगडास लावतील शेंदूर
टाकून तेल चपा चप ।
मांडून दगड होतील फरार
लुटतील देश मग झपा झप ।
Sanjay R.