तळतळता सुर्य आणी
रणरणतं किती ते उन्ह ।
चटचट झोंबतात किरणं
निघतो माणुस भाजुन ।
शोधतो झाडाची सावली
वाटतं घ्यावं थोडं बसुन ।
पाणी पाणी जिव होतो
मन गेलं किती त्रासुन ।
बाहेर आगीच्या ज्वाळा
नकोच वाटतो उन्हाळा ।
घामासह रक्तही आटतं
येउ दे लवकर पावसाळा ।
Sanjay R.