समोर घेतलेले
तुझे काळे केस ।
आणी गोड हसरा
तुझा सुंदर फेस ।
वाटतं मला
तुलाच बघतच रहावं ।
आणी तुझ्यासह
मीही खुप हसावं ।
रुसणं तुझं
मलाही बघायचं ।
थोडं रागावणं
मलाही अनुभवायचं ।
मनातलं माझ्या
कळणार कसं तुला ।
बोल अंतरातले
सांगणार कसे तुला ।
नको घलुस बंधन
वाहु दे प्रेमाचा झरा ।
तझ्या माझ्या ओठांना
भेटु दे जरा ।
तुझ्या माझ्या प्रेमात
नको आता दुरावा ।
जगतो तुझ्या आठवणीत
यालाही का हवा पुरावा ।
Sanjay R.