” आले भरुन डोळे “

भरुन आले डोळे
आसव नेत्री मावेना ।
गळी आला हुंदका
रड आता थांबेना ।
आठवणीना पुर आला
दुखः मनाचे कळेना ।
sanjay R.

आषाढ कार्तिकी
जनसागर लोटला ।
पंढरपुरात जन
भक्तीसागरात डुबला ।
विठ्ठल रखुमाई माझ्या
ह्रुदयात वसला ।
गजर नामाचा करु
जय जय हरी विठ्ठला ।
sanjay R.

आठवत मज ते लहानपण
आणी लहानपणातले खेळ ।
कधी धाबाधुबी लपाछपी
तर कधी लगोऱयांचा मेळ ।
कधी उनाडक्या करत फिरायच ।
तर कधी शाळेला बुट्टी मारुन
नाल्यावर मासोळ्यांना धरायच ।
पाठीत आईचा दणका बसता
दुर कुठतरी लपुन बसायच ।
लपुनच आईला शोधतांना
बघायच ।
आणी मनातल्या मनात
खुप हसायच ।
मित्र मैत्रीणींशी खुप भांडायच।
परत हसत हसत मिळायच ।
मोठ्ठे झालो आता म्हणुन
टेंशन मधेच जगायच ।
sanjay R.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.