” जाणतो व्यथा तुझ्या मनाची “

” चारोऴया ”

जाणतो व्यथा तुझ्या मनाची
साशंक नजर त्या जनाची
आठव जरा ते जुने दिवस
मजा काही औरच
लपुन छपुन एकांतात भेटायची
sanjay R.

घालील मी फुंकर
तुझ्या वेदनेवर
ठेव जपुन आठवणी
मनी जिवनभर
sanjay R.

टाक तोडुन ती रीत
फुलवु अशी प्रीत
गाउ या प्रेम गीत
आहेस तु माझीच मीत
sanjay R.

पक्की बांधली आहे गाठ
सुटायची नाही
केला कितीही आट
मैत्री तुझी माझी
आहे इतकी दाट
चालाया तयार मी
लांब असली जरी वाट
sanjay R.

नयन असले
जरी दोन
ओढ मात्र
मनात येक ।
बंधन असे
अनेक सारे
बंध पुरे
फक्त येक ।
sanjay R.

ho thambun ahe mi
priti chya ya rati
hat ghenya tuza hati
bas ithach julatil
aaplyatli hi nati goti

धारेविना टरबुजही
कापायचे नाही ।
जोर शब्दात नसेल तर
कुणाच्या काळजात
घुसायचे नाही ।
sanjay R.

आम्ही लिहीतो फक्त
शब्दांना धार कुठे असते ।
मनात कुणाच्या
कधी कुठे ठसते ।
मन आमचेच
आमच्यावर हसते ।
sanjay R.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.